मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Breast Cancer in Men : पुरुषांनाही असतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Breast Cancer in Men : पुरुषांनाही असतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

पुरुषांचे स्तन महिलांसारखे विकसित होत नाहीत. परंतु त्यांच्यामध्ये स्तनाच्या ऊती देखील आढळतात. पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग दुधाच्या नलिकांमध्ये होण्याची शक्यता असते. याला डक्टल कार्सिनोमा म्हणतात.

पुरुषांचे स्तन महिलांसारखे विकसित होत नाहीत. परंतु त्यांच्यामध्ये स्तनाच्या ऊती देखील आढळतात. पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग दुधाच्या नलिकांमध्ये होण्याची शक्यता असते. याला डक्टल कार्सिनोमा म्हणतात.

पुरुषांचे स्तन महिलांसारखे विकसित होत नाहीत. परंतु त्यांच्यामध्ये स्तनाच्या ऊती देखील आढळतात. पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग दुधाच्या नलिकांमध्ये होण्याची शक्यता असते. याला डक्टल कार्सिनोमा म्हणतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी : जेव्हा जेव्हा स्तनाच्या कर्करोगाचा विचार येतो. तेव्हा मनात पहिला विचार येतो की, हा स्त्रियांचा आजार आहे. पण तसे अजिबात नाही. ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. पुरुषांनाही स्तनाच्या कर्करोगाचा धोका असतो. मात्र हे जरी खरे असले तरी स्त्रियांच्या तुलनेत हा धोका कमी आहे. पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होत असले तरी आरोग्य तज्ज्ञ त्याबाबत काळजी घेण्याचा सल्ला देतात. याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे पुरुष दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नंतर ते गंभीर समस्येचे रूप घेते.

कोणत्याही रोगाचा योग्य उपचार हा रोग किती लवकर ओळखला जातो यावर अवलंबून असतो. तसेच स्तनाच्या कर्करोगाबाबतही. हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, सुरुवातीच्या टप्प्यातच स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे दिसली तर तो वाढण्यापासून रोखता येऊ शकतो. पुरुषांचे स्तन महिलांसारखे विकसित होत नाहीत परंतु त्यांच्यामध्ये स्तनाच्या ऊती देखील आढळतात. पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग दुधाच्या नलिकांमध्ये होण्याची शक्यता असते. याला डक्टल कार्सिनोमा म्हणतात.

सतत येणाऱ्या थकव्याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, 'या' कॅन्सरचे असू शकते लक्षण

बातमीनुसार, स्तनाच्या कर्करोगाच्या सर्व प्रकरणांपैकी पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. 2015 मध्ये, पुरुष स्तनाच्या कर्करोगाची सुमारे 2,350 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. ब्रेस्ट कॅन्सरमुळे आतापर्यंत सुमारे 440 पुरुषांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुरुषांमधला ब्रेस्ट कॅन्सर हा एक असामान्य आजार आहे, त्यामुळे लोकांना त्याबद्दल माहिती नसते. हे त्याच्या वाढीचे प्रमुख कारण आहे.

कोणत्या लोकांना असतो जास्त धोका

सध्या पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. जरी असे मानले जाते की, वाढत्या वयानुसार त्याचा धोका वाढतो. आतापर्यंत ज्या लोकांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे आढळून आली आहेत, त्यांचे सरासरी वय 60-70 वर्षांच्या दरम्यान असल्याचे आढळून आले आहे. तज्ज्ञांच्या मते, अंडकोषांमध्ये सूज आल्याने वैद्यकीय भाषेत ज्याला ऑर्कायटिस म्हणतात त्याचा धोका वाढू शकतो. जर तुमच्या जवळच्या व्यक्तीला स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर तुम्हालाही स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे : पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे महिलांसारखीच असतात.

- स्तनात गाठ जाणवणे

- स्तनाचा आकार वाढणे

- स्तनाग्र दुखणे

- अंडरआर्म लिम्फ नोड्स वाढणे

जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही ताबडतोब तुमच्या आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्यावा. जर तुमचे दोन्ही स्तन वाढत असतील तर त्याला गायनेकोमास्टिया म्हणतात आणि ते कर्करोगाचे लक्षण नाही. ही स्थिती कधीकधी जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे, जास्त वजन उचलल्यामुळे, गांजाचे सेवन केल्यामुळे किंवा काही औषधांच्या प्रभावामुळे उद्भवू शकते.

या कारणांमुळे होऊ शकतो कॅन्सर, आयुष्यातील 'हे' छोटे-छोटे बदल करतील बचाव

पुरुष स्तन कर्करोग उपचार

तुम्हाला स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेट द्या आणि तुमची स्थिती सांगा. तज्ञ तुमचा वैद्यकीय इतिहास तपासतील आणि त्यानंतर ते तुम्हाला अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय करण्‍याचा सल्ला देतील. याच्या मदतीने तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरची संपूर्ण माहिती मिळेल. यासोबतच तज्ज्ञ तुम्हाला रक्त तपासणीसाठीही सांगू शकतात. याशिवाय कर्करोगाची शक्यता असल्यास डॉक्टर बायोप्सीही करू शकतात. यामध्ये चाचणीसाठी सुईद्वारे तुमचे स्तनाचे ऊतक काढले जाते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Breast cancer, Cancer, Health, Health Tips, Lifestyle