मुंबई, 6 जानेवारी : ऑप्टिकल इल्युजनच्या पोस्ट्स सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय असतात. डोकं खाजवायला लावणाऱ्या गोष्टी सामान्यपणे सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळेच ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्यांमध्ये अनेक जण रमतात. ही कोडी सोडवणं म्हणजे बुद्धीचा खेळ असतो. डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींमध्ये बरेचदा अनेक जण गुंतून पडतात; पण उत्तर दुसरीकडेच असतं. दृष्टिभ्रमाचा खेळ त्यासाठीच प्रसिद्ध आहे. यानं मनोरंजनही चांगलं होतं. त्यामुळेच नेटिझन्स या पोस्ट्सना पसंती देतात. सध्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये युझर्सना टर्की पक्ष्यांच्या चित्रामधून भोपळा शोधायचा आहे. हे कोडं सोडवण्यासाठी वाचकांकडे 15 सेकंदांचा वेळ आहे. ऑप्टिकल इल्युजनचं हे चित्र हंगेरीचे प्रसिद्ध चित्रकार व आर्टिस्ट गेर्जली डुडास यांनी रेखाटलं आहे. ऑप्टिकल इल्युजनची कोडी आपल्या चित्रांमधून मांडणारे हे प्रसिद्ध चित्रकार आहेत. त्यांची कोडी सोडवणं हे अतिशय कठीण आव्हान असतं. त्यांनी या वेळी टर्की पक्ष्यांचं चित्र काढलंय. यात अनेक टर्की पक्षी आहेत. काही टर्की पक्ष्यांनी काळी हॅट घातलीय. एका टर्कीने सांताक्लॉजची लाल टोपी घातलीय, तर एकानं निळी कॅप घातलीय. या सगळ्या टर्की पक्ष्यांचा रंग पिवळा, नारिंगी असा आहे. त्यातूनच वाचकांना भोपळा शोधायचा आहे. तो शोधण्यासाठी 15 सेकंदांचा अवधी आहे. हेही वाचा: ‘हे’ 8 पाळीव प्राणी आहेत अब्जाधीश; थाट पाहून तुम्हीही व्हाल अवाक टर्कीचे पंख आणि भोपळा यांचा आकार सारखाच असल्यानं कोडं सोडवणं कठीण आहे. त्यातच दोन्हींचे रंगही सारखे आहेत. त्यामुळे भोपळा सापडणं मुश्कील आहे; पण एक वेगळेपण आहे. ज्याची नजर तीक्ष्ण असेल, त्यालाच ते वेगळेपण शोधता येईल. तुम्हालाही भोपळा शोधणं अवघड वाटत असेल, तर हरकत नाही. त्याचं उत्तर शोधण्यासाठी चित्र पुन्हा एकदा नीट पाहा. प्रत्येक टर्कीचं निरीक्षण करा, म्हणजे त्यांचं वेगळेपण लक्षात येईल. नाहीच सापडलं, तर खाली दिलेला फोटो पाहा, म्हणजे उत्तर सापडेल. चित्रामध्ये उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात एका टर्कीच्या पंखावर भोपळा दिसेल. चित्रकारानं तो अतिशय खुबीनं लपवलेला आहे. त्यामुळे शोधणारा वाचक खरोखरच बुद्धिमान म्हणावा लागेल. ऑप्टिकल इल्युजनची चित्रं बुद्धीला चालना देणारी असतात. बरेचदा बुद्धिमत्ता चाचणीसाठीही या चित्रांचा उपयोग केला जातो. तसंच मानसोपचार तज्ज्ञही याचा थेरपीमध्ये वापर करतात. या चित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या व्यक्तीचं वेगळेपण अधोरेखित करतात. त्यामुळेच ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्यांना खूप महत्त्व आहे. तसंच हे मनोरंजनाचं साधनही असल्यानं सोशल मीडियावर ही कोडी लोकप्रिय असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.