मुंबई, 6 जानेवारी- जगातल्या सर्वांत श्रीमंत प्राण्यांबाबतचा ‘द अल्टिमेट पेट रिच लिस्ट’ नावाचा अहवाल ‘ऑल अबाउट कॅट्स’ या वेबसाइटने प्रसिद्ध केला आहे. या यादीतले लाडके पाळीव प्राणी लाखो रुपये संपत्तीचे मालक आहेत. ते अतिशय विलासी आणि आरामदायी जीवनाचा आनंद घेतात. अनेकांना त्यांचा हेवादेखील वाटतो. जगातल्या या श्रीमंत प्राण्यांपैकी काही सोशल मीडिया वर स्टार आहेत, तर काही प्राणी यशस्वी व्यवसायांचे मालक आहेत. काहींना त्यांच्या मालकांच्या नशीबाचा वारसा मिळाला आहे. जगातले 8 सर्वांत श्रीमंत पाळीव प्राणी 1. गुंथर व्ही (Gunther VI) गुंथर व्ही हा जर्मन शेफर्ड बऱ्याच काळापासून जगातला सर्वांत श्रीमंत पाळीव प्राणी आहे. ‘ऑल अबाउट कॅट्स’ने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे 500 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती आहे. सर्वांत श्रीमंत प्राण्यांच्या यादीतल्या रनर अपपेक्षा गुंथर पाचपट श्रीमंत आहे. सोशल मीडियाद्वारे आणि योग्य गुंतवणुकीद्वारे त्याची संपत्ती वाढली आहे. गुंथरला 500 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती त्याच्या आजोबांकडून मिळाली आहे. त्याचे आजोबा दिवंगत जर्मन काउंटेस कार्लोटा लीबेन्स्टाईन यांचे लाडके पाळीव प्राणी होते. 1992मध्ये जेव्हा काउंटेसचा मृत्यू झाला, तेव्हा तिने गुंथर III ला तिची 80 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती देऊ केली होती. तेव्हापासून ती गुंथर कॉर्पोरेशनच्या काही स्मार्ट गुंतवणुकीमुळे वाढली आहे.
Gunther VI mit ca $500 mio pic.twitter.com/e8FeuOkWDG
— sven 🐝 (@tzven_) January 4, 2023
2. नाला (Nala) नाला हे मांजर इन्स्टाग्राम स्टार आहे. याशिवाय ते एका बिझनेसचं मालकही आहे. सियामी-पर्शियन मिक्स जातीची ही मांजर प्रीमियम कॅट फूडची मालकीण आहे. नालाकडे 100 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती आहे. इन्स्टाग्राामवर तिचे 4.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. गिनीज रेकॉर्ड बुकमध्ये तिच्या नावाची नोंद आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेलं मांजर, असा किताब तिला मिळालेला आहे. वारीसिरी पोकी मेथाचिट्टीफन आणि शॅनन एलिस हे नालाचे मालक आहेत.
3. ऑलिव्हिया बेन्सन (Olivia Benson) ऑलिव्हिया बेन्सन ही प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टची लाडकी मांजर आहे. ती तिच्यासोबत अनेक म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमध्ये दिसली आहे. स्कॉटिश फोल्ड जातीच्या या मांजरीने आपल्या मालकिणीसह अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये झळकून नशीब कमावलं आहे. या मांजरीने स्वतःची मर्चंडाइज लाइन तयार केली आहे आणि अनेक मोठ्या-बजेटच्या जाहिरातींमध्ये कॅमिओ केले आहेत," असं ‘ऑल अबाउट कॅट्स’च्या अहवालात म्हटलं आहे. ऑलिव्हिया बेन्सनची एकूण संपत्ती 97 दशलक्ष डॉलर्स आहे. ज्यामुळे ती जगातली तिसरी सर्वांत श्रीमंत प्राणी आहे.
4. सॅडी, सनी, लॉरेन, लैला आणि ल्यूक सॅडी, सनी, लॉरेन, लैला आणि ल्यूक हे ओप्रा विन्फ्रेचे पाळीव कुत्रे आहेत. अब्जाधीश असलेल्या टॉक शो होस्ट ओप्राने प्रत्येकाच्या नावे 30 दशलक्ष डॉलर्सची नोंद केली आहे. 5. जिफपॉम (Jiffpom) जगातल्या सर्वांत श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे जिफपॉम नावाचा एक पोमेरेनियन कुत्रा. इंटरनेट स्टार असलेल्या जिफपॉमचे इन्स्टाग्रामवर 9.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जिफपॉमची निव्वळ संपत्ती 25 दशलक्ष डॉलर्स आहे. ती त्याला मोठ्या प्रमाणात एंडॉर्समेंट डील्समधून मिळालेली आहे. तो सर्वाधिक कमाई करणारा कॅनाइन पेट इन्फ्लुएन्सर आहे. त्याच्या प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी 32 हजार 906 डॉलर्सपर्यंत शुल्क आकारलं जातं.
6. शुपेट (Choupette) शुपेट ही प्रसिद्ध दिवंगत फॅशन डिझायनर कार्ल लेजरफेल्ड यांची मांजर आहे. कार्लच्या मृत्यूनंतर तिला लाखो रुपये मिळाले आहेत. एससीएमपीच्या मते, फॅशनेबल मांजरीने तिची स्वतःच्या मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट्स आणि एंडॉर्समेंट्समधून 4.5 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत. सध्या तिची एकूण संपत्ती सुमारे 13 दशलक्ष डॉलर्स आहे.
7. पाँटियाक (Pontiac) प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री बेट्टी व्हाइटचा लाडका गोल्डन रिट्रायव्ह पाँटियाक 2017मध्ये मरण पावला. ‘ऑल अबाउट कॅट्स’च्या मते, त्याला व्हाइटकडून पाच दशलक्ष डॉलर्सचा वारसा मिळाला असता.
8. डग द पग (Doug the Pug) डग द पग हा इन्स्टाग्राम स्टार असलेला कुत्रा आहे. ग्राफिक्स डिझायनर लेस्ली मोझियरच्या या प्रसिद्ध श्वानाने इन्स्टाग्राम डील्स, प्रायोजित पोस्ट आणि एंडॉर्समेंट्समधून 1.5 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे.