मुंबई, 19 फेब्रुवारी : ऑप्टिकल इल्युजनसाठी काही चित्रं किंवा फोटो खास काढलेले असतात; मात्र वास्तव आयुष्यातल्या एखाद्या फोटोमध्येही दृष्टिभ्रमाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात पायऱ्यांवर असलेला साप शोधणं हे युझर्ससमोरचं खूप कठीण आव्हान आहे. पायऱ्यांवरच्या एका बिळातून तो डोकावत होता. हा साप शोधणं सर्पमित्रांनाही खूप अवघड गेलं. सर्पमित्र एंज ब्रॉडस्टॉकने कुशलतेनं सापाला बाहेर काढून पकडलं. त्यांनी काढलेल्या फोटोंमध्ये युझर्सना साप शोधायचा आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लाल विटांच्या पक्क्या पायऱ्या दिसत आहेत. तिथेच काही वाळलेली पानंही पडलीत. त्यांच्या जवळच सापही आहे. पण फोटो पाहून सहजासहजी तो दिसणार नाही. म्हणूनच हा फोटो ऑप्टिकल इल्युजनचं आव्हान म्हणून व्हायरल झालाय. फोटोमध्ये पायऱ्यांचा लाल रंग, वाळलेल्या पानांचा रंग अशी रंगांची सरमिसळ झाली आहे, यामुळे तो साप शोधणं अवघड आहे. हेही वाचा - नजर तीक्ष्ण असेल तर ‘या’ पेंटिंगमध्ये लपलेला कुत्रा शोधून दाखवाच; तुमच्याकडे आहेत फक्त 10 सेकंद
पायऱ्यांजवळ असलेल्या बिळातून केवळ डोकं बाहेर काढून तो साप सर्पमित्रांना चकवत होता, असं सापाचा फोटो काढणाऱ्या सर्पमित्राने म्हटलंय. सापाला पकडण्यासाठी जवळ गेल्यावर तो बिळात घुसून बसायचा किंवा दुसऱ्या मार्गाने कुठे तरी निघून जायचा. त्यामुळे सर्पमित्रांनी बिळाच्या आजूबाजूच्या पोकळीत कागद भरून ती बंद करून ठेवली. म्हणजे बिळात पाणी भरल्यावर साप दुसरीकडे कुठेही न जाता बिळातूनच बाहेर येईल. अशा पद्धतीनं अखेर साप बिळातून बाहेर आला. त्यामुळे सर्पमित्रांनी सापाला शोधलं व पकडलं; पण त्या फोटोमध्ये लपलेल्या सापाला तुम्हाला शोधता येतंय का? हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. कारण फोटोमध्ये सापाचं केवळ डोकंच बिळातून बाहेर आलेलं दिसतंय. नसेल सापडत तर ‘या’ फोटोत साप कुठे आहे हे दाखवलेलं आहे.
लपाछपीचा खेळ बालपणातला सगळ्यांचा आवडता खेळ असतो. ऑप्टिकल इल्युजन हे त्याचं ऑनलाइन रूप आहे. यात चित्रात किंवा फोटोत लपलेली एखादी गोष्ट तुम्हाला शोधायची असते. हा खेळ नुसता रंजकच नसतो, तर त्यातून बुद्धिमत्तेची चाचणीही घेता येते. तसंच व्यक्तिमत्त्वही तपासता येतं. एखाद्या फोटोकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असते. त्यामुळे त्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व उलगडता येतं. मानसोपचार थेरपीजमध्ये याचा वापर केला जातो. ऑप्टिकल इल्युजनद्वारे बुद्धिमत्ता तपासायची असेल, तर ते शक्य असतं; मात्र बुद्धिमत्ता चाचणीसाठी केवळ याच माध्यमावर अवलंबून राहता येत नाही. त्यासाठी इतरही अनेक मार्ग उपलब्ध असतात. ऑप्टिकल इल्युजनची कोडी बुद्धीला चालना देणारी व मनोरंजक असल्यानं सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होतात. त्यामुळेच त्यांना भरपूर व्ह्यूज आणि लाइक्स मिळतात.