जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Optical Illusion : मेंढ्यांच्या कळपात लपला आहे एक लांडगा; शोधण्यासाठी वेळ दिलाय फक्त 7 सेकंदांचा

Optical Illusion : मेंढ्यांच्या कळपात लपला आहे एक लांडगा; शोधण्यासाठी वेळ दिलाय फक्त 7 सेकंदांचा

Optical Illusion

Optical Illusion

वाचकांना मेंढ्यांच्या कळपामध्ये लपलेला एक लांडगा शोधायचा आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी 7 सेकंदांचा वेळ देण्यात आलाय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 02 फेब्रुवारी :  ऑप्टिकल इल्युजनची कोडी खूप रंजक असतात. एखाद्या चित्रात वेगवेगळे आकार, रंगसंगती व नक्षी यांच्या एकत्रीकरणातून नजरेला फसवणारं दृश्य तयार केलं जातं. अशा चित्रातून सांगितलेली गोष्ट शोधणं वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी नजर आणि बुद्धी यांची योग्य सांगड घालावी लागते. म्हणूनच अशी कोडी बुद्धीला चालना देणारी असतात. काही वेळा चित्रकाराने ती गोष्ट बेमालूमपणे चित्रात मिसळलेली असते. त्यामुळे भल्याभल्यांनाही ते कोडं सुटत नाही. असंच एक कोडं सध्या खूप व्हायरल होतंय. त्यात वाचकांना मेंढ्यांच्या कळपामध्ये लपलेला एक लांडगा शोधायचा आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी 7 सेकंदांचा वेळ देण्यात आलाय. ‘झी न्यूज’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. या कोड्यामध्ये चित्रकारानं मेंढ्यांचा कळप दाखवलेला आहे. पांढऱ्या रंगात असलेल्या या मेंढ्या लहान-मोठ्या आकाराच्या आहेत. एका हिरव्या मैदानात त्या मेंढ्या चरत आहेत. या कळपातच एक लांडगाही घुसलेला आहे. त्याला शोधण्याचं आव्हान वाचकांसमोर आहे. हेही वाचा - Optical Illusion : बुद्धीला जोर द्या अन् शोधा सुंदर जंगलात लपलेला सिंह; फक्त 10 सेकंदात हे कोडं सोडवणं सोपं नाही. अनेकांना ते जमलेलं नाही. तुम्हालाही ते कोडं सोडवणं जमत नसेल, तर चित्र काळजीपूर्वक पाहा. त्यात उजव्या बाजूला मध्यभागी मेंढ्यांच्या कळपात मेंढीसारखी पांढरी लोकर अंगावर घेऊन एक लांडगा आलेला दिसेल.

    News18

    ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रमाची चित्रं किंवा फोटो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होतात. या चित्रांमधून मेंदूला चालना मिळते. डोळ्यांसाठीही ही चित्रं आव्हानात्मक असतात. दृष्टिभ्रमाच्या फोटोजचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी, तसंच काही मानसोपचार थेरपीजमध्येही केला जातो. अशा चित्रांमध्ये एखादी वस्तू किंवा चित्र एकमेकांमध्ये अशा प्रकारे मिसळलेलं असतं, की बघणाऱ्याचा गोंधळ होतो. माणसाचा मेंदू गोष्टींचं आकलन कसं करतो, हे जाणून घेण्यासाठीही मानसशास्त्रात दृष्टिभ्रमाचा उपयोग केला जातो. सामान्य माणूस एखाद्या चित्राकडे खूप वैविध्यपूर्ण दृष्टिकोनांमधून पाहू शकतो. त्यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समोर येतात. त्याचा उपयोग त्याचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी होतो. मेंदूला अधिक तल्लख करण्याच्या दृष्टीनं दृष्टिभ्रम खूप फायदेशीर ठरतात. ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोजचा लहान मुलांसाठीही फायदा होतो. यामुळे आकलनक्षमता विकसित होण्यास मदत होते. विचार करण्याची क्षमता वाढते. एखाद्या गोष्टीचा अर्थ लावण्याचं कौशल्य वाढतं. सोशल मीडियावर असे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. त्याला युझर्सचे खूप लाइक्स मिळतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात