• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • अरे बापरे! फक्त एका शिंकेत मोडू शकतात बरगड्या; भयंकर आजाराशी झुंज देतोय चिमुकला

अरे बापरे! फक्त एका शिंकेत मोडू शकतात बरगड्या; भयंकर आजाराशी झुंज देतोय चिमुकला

या भयंकर आजारामुळे चिमुकल्याच्या शरीरातील इतर हाडं आधीच मोडली आहेत.

  • Share this:
वॉशिंग्टन, 06 सप्टेंबर : जगभरातल्या अनेक व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ विकार असतात. ज्याचे परिणाम इतके भयंकर असतात की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. अमेरिकेतला एक छोटा मुलगा सध्या अशाच प्रकारच्या एका दुर्मिळ विकाराने ग्रस्त आहे. या दुर्मिळ विकारामुळे त्याच्या जिवाला धोका आहे. इतका की फक्त एका शिंकेतच (Sneezing) त्याच्या बरगड्या मोडू शकतात (Sneezing cause fracturing ribs). लिंकन गश (Lincoln Gush) असं त्या मुलाचं नाव असून, तो सहा वर्षांचा आहे. त्याला ऑस्टिओजेनेसिस इम्पर्फेक्टा (Osteogenesis Imperfecta) अशा नावाचा विकार झाला आहे. हा विकार झालेल्या व्यक्तीची हाडं इतकी कमजोर, शक्तिहीन होतात की आपली अगदी दैनंदिन, साधी-सोपी कामं केल्यामुळेही ती तुटू शकतात. हा विकार झालेल्या व्यक्तींच्या हाडांमध्ये कोलोजेन (Cologen) नावाचं आवश्यक प्रोटीन एक तर अजिबातच नसतं किंवा असलंच तर फार कमी प्रमाणात असतं. त्यामुळे त्या व्यक्तींची हाडं फार कमजोर असतात. या विकारामुळे लिंकन गशच्या शरीरातलीही काही हाडं आतापर्यंत मोडली आहेत. त्यात डोक्याच्या, हाताच्या आणि पाठीच्या कण्याच्या हाडांचा समावेश आहे. त्याची हाडं इतकी कमजोर आहेत, की तो जोराने शिंकला तरी त्याच्या छातीच्या बरगड्या तुटू शकतात. हे वाचा - OMG! जन्मतःच गोंडस बाळ झालं म्हातारं; चिमुकल्या लेकीचं रूप पाहून आईसुद्धा शॉक बर्क्स इथे राहणाऱ्या लिंकनची आई अमांडा सांगते, की घराबाहेर जाण्यासाठी तो ज्या व्हिलचेअरचा (Wheelchair) वापर करतो, ती आता त्याच्यासाठी खूपच छोटी होऊ लागली आहे; मात्र त्याच्यासाठी नवी व्हीलचेअर खरेदी करण्याकरिता आपल्याकडे पैसे नसल्याचंही अमांडा खेदाने नमूद करते. लिंकनचे आई-वडील आता ऑनलाइन कँपेनच्या (Online Campaign) माध्यमातून पैसे गोळा करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी तीन हजार पौंड म्हणजेच जवळपास तीन लाख रुपये ऑनलाइन कँपेनद्वारे जमवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आतापर्यंत त्यांना 75 हजार रुपये जमवण्यात यश आलं आहे. अमांडा स्वतःदेखील ऑस्टिओजेनेसिस इम्पर्फेक्टा या विकाराने ग्रस्त आहे. मिरर वेबसाइटशी संवाद साधताना अमांडाने सांगितलं, 'लिंकनचं पालनपोषण करणं अवघड आहे, याचा विचार मी केला होता; मात्र माझ्या विचारांपेक्षाही ते अवघड आहे. मी स्वतःही त्या वेदना सोसल्या आहेत. त्यामुळे तो किती वेदना सोसतोय, याची मला कल्पना आहे. शिंकल्यामुळे माझ्याही शरीरातली हाडं मोडली आहेत. आता तो शिंकला, की त्याची हाडं मोडतात.' हे वाचा - इंजेक्शन घेऊन घेऊन फुगवले, फायटिंग करताना फुटले Biceps; Shocking video ज्यांना हा विकार असतो, त्यांच्या शरीरात ऑपरेशनद्वारे मेटल रॉड (Metal Rod) अर्थात धातूची सळई घातली जाते. त्यामुळे हाडांना आधार मिळू शकतो. लिंकनच्या छातीच्या त्वचेच्या खाली एक उपकरण बसवण्यात आलं आहे. त्याद्वारे त्याच्यावर उपचार करणं शक्य होत आहे. त्या उपकरणामुळे लिंकन स्वतःला आयर्न मॅन समजतो.
First published: