महिला सक्षमीकरण व्हावं, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा तसंच शहरातील परिसर स्वच्छ आणि निरोगी राहावा या उद्देशाने ओडिशातील कोटपड एनएसीतील बचत गटानं चार महिलांना बॅटरीचलित वाहन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. सध्या या महिला या वाहनाचा उपयोग करुन परिसरातील 4560 घरांमधून कचरा संकलित करतात. हा एक अनोखा उपक्रम आहे, असं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - मुस्लीम विद्यार्थिनीने मिळवली संस्कृतमध्ये PHD! प्रबंधासाठी सुवर्णपदक देऊन गौरव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्चमध्ये लाॅकडाऊन जारी केला. देशातील अन्य भागांप्रमाणेच कोरापट जिल्ह्यातील रोजगारावर लाॅकडाऊनमुळे परिणाम झाला. बिझनेस स्टॅण्डर्डच्या वृत्तानुसार, ओडिशात अंदाजे 2.5 दशलक्ष स्थलांतरित कामगार आहेत. शेती आणि स्थलांतर या दोन घटकांवरच येथील रोजगार अवलंबून आहे. लाॅकडाऊनचा फटका या दोन्ही घटकांना बसल्याने येथील रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. हे वाचा - लोक निवृत्त होतात त्या वयात सुरू केली कंपनी, 90 व्या वर्षीही सांभळतात व्यवसाय या पार्श्वभूमीवर कोटपड शहरात बचतगटाने महिला सक्षमीकरण, रोजगार आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने राबवलेल्या हा उपक्रम महत्वपूर्ण असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.In a unique initiative to empower women & provide employment, Kotpad NAC, Odisha has engaged 4 women from SHGs and trained them for driving battery-operated vehicles to collect segregated waste from 4,560 homes to keep the area clean and healthy. #SelfReliant #AatmaNirbharBharat pic.twitter.com/4XPjMaLQ2E
— Ministry of Housing and Urban Affairs (@MoHUA_India) December 1, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Woman