Home /News /career /

मुस्लीम विद्यार्थिनीने मिळवली संस्कृतमध्ये PHD! प्रबंधासाठी सुवर्णपदक देऊन गौरव

मुस्लीम विद्यार्थिनीने मिळवली संस्कृतमध्ये PHD! प्रबंधासाठी सुवर्णपदक देऊन गौरव

गुजरात विद्यापीठातील (Gujrat University) मधील एका मुस्लीम विद्यार्थिनीने (Muslim Student) संस्कृत भाषेतून (Sanskrit language) PHD पूर्ण केली आहे. सलमा कुरेशी (Salma Qureshi) असं या 26 वर्षांच्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

    अहमदाबाद, 4 डिसेंबर : भाषेला कोणत्याही धर्माच्या, जातीच्या किंवा प्रदेशाच्या कोंदणात बंदिस्त करता येत नाही. भाषेला बंदिस्त करण्याचे, एखाद्या विशिष्ट भाषेला टार्गेट करण्याचे प्रयत्न देखील झाले, पण ते प्रयत्न कधीही पूर्ण झाले नाहीत. गुजरात विद्यापीठातील (Gujrat University) एका मुस्लीम विद्यार्थीनीने (Muslim Student) संस्कृत भाषेतून (Sanskrit language) PHD पूर्ण करत हे त्रिवार सत्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सलमा कुरेशी (Salma Qureshi) असं या 26 वर्षांच्या विद्यार्थीनीचे नाव आहे. ती गुजरात विद्यापीठाची विद्यार्थीनी आहे. सलमाने भारतामधील गुरु-शिष्य परंपरेचा अभ्यास केला आहे. सलमाने प्रा. अतूल उनागर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पूर्णेशू निरुपिता शिक्षा पद्धती एकम् आद्यायन’ या विषयात प्रबंध सादर केला. या प्रबंधाबद्दल तिचा सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला आहे. तीन वर्ष कठोर परिश्रम! सलमाने 2017 साली सौराष्ट्र विद्यापीठामधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने गुजरात विद्यापीठात PHD साठी नाव नोंदवले. तीन वर्ष तीन महिने अभ्यास केल्यानंतर सलमाने  प्रबंध पूर्ण केला आणि PHD मिळवली. “गुरु शिष्य परंपरेचा उल्लेख वेद आणि पुरणांपासून आढळतो. मला शाळेतच संस्कृत भाषा होती. संस्कृत भाषा शिकत असतानाच वेद आणि पुराण अभ्यासाची गोडी लागली. माझ्या परिवाराने देखील माझ्या संस्कृत अभ्यासाला कधीही विरोध केला नाही,’’ असे सलमाने सांगितले. ‘भाषा आणि धर्माचा संबंध नाही’ “हिंदू धार्मिक ग्रंथ हे संस्कृतमध्ये असल्याने ती देवांची भाषा असल्याचे मानले जाते. मात्र, माझ्यामते कोणत्याही भाषेचा धर्माशी संबंध नाही. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची भाषा शिकण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे. प्राचीन काळी गुरु-शिष्य परंपरा होती. त्यामध्ये समाजातील सर्व वर्गाचा आदर करण्याचे शिक्षण दिले जात असे. ती सहिष्णू परंपरा कालांतराने लुप्त झाली,’’ अशी खंत सलमाने बोलून दाखवली. संस्कृत ही अनिवार्य भाषा म्हणून शिकवण्यात यावी आणि ही भाषा सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणीही सलमाने केली आहे.
    First published:

    Tags: Education

    पुढील बातम्या