समुद्रतळाशी विसावलेल्या टायटॅनिकचे नवीन फोटो समोर आले आहेत. हे फोटो 12,500 फूट खोल पाण्यात जाऊन काढण्यात आले आहेत. यासाठी फायबरपासून बनलेली टायटन नावाची पाणबुडी समुद्रात उतरविण्यात आली होती.
ओशनगेट एक्सपेडिशन्सने 13 जुलै रोजी घोषणा केली की त्यांनी टायटनच्या मदतीने टायटॅनिकचे नवीन फोटो क्लिक केले आहेत. यात टायटॅनिकचे भाग दिसतील.
ओशनगेट एक्सपेडिशन्सने लोकांना टायटॅनिक दौर्याची ऑफर देखील दिली आहे. या दौऱ्याच्या तिकिटाची किंमत तब्ब्ल 1 कोटी 12 लाख रुपये एवढी आहे.
15 एप्रिल 1912 ला टायटॅनिकचा अपघात झाला आणि ते महाकाय जहाज बुडालं. या घटनेत 1500 प्रवासी मृत्युमुखी पडले होते. या घटनेवर आधारित Titanic सिनेमाही आला होता.
या अभियानामुळे ओशनगेटला बराच फायदा झाला आहे. त्यांच्या या प्रकल्पात लोक गुंतवणूक करीत आहेत. आतापर्यंत ओशनगेटने दोन वेळा तळाशी फेऱ्या मारल्या आहेत.