मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लग्नसराईत नवरीप्रमाणे फिट दिसायचं? पाहा तज्ज्ञांनी सांगितलेले हे 3 सोपे उपाय

लग्नसराईत नवरीप्रमाणे फिट दिसायचं? पाहा तज्ज्ञांनी सांगितलेले हे 3 सोपे उपाय

सर्वानाच खूप सुंदर आणि फिट दिसायचं असत. मग ते लग्न असो किंवा पार्टी. विशेषतः लग्नामध्ये नवरी तर सुंदर दिसतच असते. मात्र नवरीसोबतच्या तिच्या सर्व मैत्रिणींनाही तिच्या इतकच सुंदर आणि फिट दिसण्याची इच्छा असते.

सर्वानाच खूप सुंदर आणि फिट दिसायचं असत. मग ते लग्न असो किंवा पार्टी. विशेषतः लग्नामध्ये नवरी तर सुंदर दिसतच असते. मात्र नवरीसोबतच्या तिच्या सर्व मैत्रिणींनाही तिच्या इतकच सुंदर आणि फिट दिसण्याची इच्छा असते.

सर्वानाच खूप सुंदर आणि फिट दिसायचं असत. मग ते लग्न असो किंवा पार्टी. विशेषतः लग्नामध्ये नवरी तर सुंदर दिसतच असते. मात्र नवरीसोबतच्या तिच्या सर्व मैत्रिणींनाही तिच्या इतकच सुंदर आणि फिट दिसण्याची इच्छा असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 डिसेंबर : आता सण, पार्ट्या आणि लग्नसराईचा हंगाम आहे. या काळात केवळ उत्सवमूर्ती किंवा वर-वधू यांचा नाही तर सर्वानाच खूप सुंदर आणि फिट दिसायचं असत. मग ते लग्न असो किंवा पार्टी. विशेषतः लग्नामध्ये नवरी तर सुंदर दिसतच असते. मात्र नवरीसोबतच्या तिच्या सर्व मैत्रिणींनाही तिच्या इतकच सुंदर आणि फिट दिसण्याची इच्छा असते.

आपल्या पोटाच्या समस्या नसतील तर वजन वाढणे, पॉट फुगणे किंवा गॅसेस अशा समस्या होत नाहीत. म्हणजेच आपले वजन नियंत्रित राहते आणि दिसते. मुलींना लग्नात असेच फिट दिसायचे असते. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी लग्नसराईत फिट दिसण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. पाहुयात काय आहेत हे उपाय.

लग्नात स्टायलिश दिसण्यासाठी मॅचिंग बांगड्या तर हव्याच! पाहा काय आहेत पर्याय, Video

1. जेव्हा तुम्हाला संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमाला जायचे असते तुमचे पॉट आहे य्त्यापेक्षा जास्त फुगलेले दैत्याला नको असेल तर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर लगेचच हिंग आणि काळे मीठ एक ग्लास ताकामध्ये घालून प्यावे. ताक प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे, तर हिंग आणि काळे मीठ हे कॉम्बिनेशन ब्लोटिंग, गॅस कमी करण्यात आणि IBS लक्षणे कमी करण्यास मदत करेल.

2. तुम्ही एखाद्या डेस्टिनेशन वेडींगला जाणार असाल तर झोपण्याच्या वेळी 1 टीस्पून च्यवनप्राश खावे. हे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देते. तसेच हे फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत असते. लग्नाच्या उत्सवाच्या आणि धावपळीच्या काळात हे तुमची त्वचा लवचिक आणि मऊ ठेवण्यास मदत करते.

बांगडी, बाजूबंद, हार आणि बरंच काही... मोत्याच्या दागिन्यांचा थाट अन् लग्नात तुमचीच हवा

3. गूळ, तूप आणि कोरडे आले घालून बनवलेले मेथीचे लाडू पोटात पेटके आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते, आतड्यांसंबंधी श्लेष्मल त्वचा वाढवते आणि केसांना चमकदार ठेवण्यास मदत करते. या लाडवांचे सेवन नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी 4-6 जेवण म्हणून करा. जर तुमचे रुटीन आणि झोपेच्या वेळा बदलल्या असतील किंवा तुम्ही वर्कआउटही करत नसाल तर.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Wedding, Weight loss tips