Home /News /lifestyle /

आता QR कोडद्वारे ओळखता येणार बनावट औषधं; 'या' दिवसापासून लागू होणार नियम

आता QR कोडद्वारे ओळखता येणार बनावट औषधं; 'या' दिवसापासून लागू होणार नियम

भारतात बनावट औषधांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. एपीआयमध्ये (API) क्यूआर कोड (QR Code) टाकण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आता खरी आणि बनावट औषधे ओळखणे सोपे होणार आहे.

    नवी दिल्ली, 20 जानेवारी : बनावट औषधांना आळा घालण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. औषधांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स (API) वर क्यूआर कोड (QR Code) टाकणे सरकारने बंधनकारक केले आहे. याच्या मदतीने अवघ्या काही सेकंदात खरे आणि बनावट औषध ओळखता येते. ग्राहकांना आता मोबाईलवरून कोणत्याही औषधावर असलेला QR कोड स्कॅन करून त्याची वास्तविकता सहज कळू शकणार आहे. नवीन नियम पुढील वर्षी 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल. देशात कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या वैद्यकीय क्षेत्राला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. यातच औषधांची मागणी आणि पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण यात बनावट औषध विक्रींचंही प्रमाण वाढलं आहे आणि यातून अनेकांच्या जीवावर बेतल्याचीही प्रकरणं आपण पाहिली असतील. यालाच आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जबरदस्त उपाय शोधला आहे. काही सेकंदा औषधाची सत्यता कळणार या नव्या नियमाबाबत आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) अधिसूचना जारी केली आहे. एपीआयमध्ये क्यूआर कोड टाकण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आता खरी आणि बनावट औषधे ओळखणे सोपे होणार आहे. QR कोडमध्ये औषधाची संपूर्ण माहिती असेल. बेंच नंबर, सॉल्ट, किंमत याची माहिती मिळेल. मोबाईलवरून QR कोड स्कॅन केल्यास औषधाची संपूर्ण माहिती मिळणार आहे. QR कोडमुळे आता कोणतं औषध गुणवत्तापूर्ण आणि कोणतं बनावट आहे हे ओळखता येणार आहे. अवघ्या काही सेकंदात तुम्ही विकत घेत असलेलं औषध बनावट आहे का याची पडताळणी करुन शकणार आहात. अजबच! 67 वर्षे अंघोळ नाही, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही औषधाच्या कच्च्या मालाचीही माहिती मिळणार API वर QR कोड लावण्यात आल्यामुळे आता संबंधित औषध तयार करण्यासाठी कच्चा माल कुठून मागवण्यात आला आहे, याचीही माहिती कळणार आहे. तसंच औषध तयार करण्याच्या फॉर्म्युलामध्ये कोणत्याही पद्धतीची छेडछाड तर केली गेली नाहीय ना याची माहिती मिळणार आहे. अॅक्टीव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स हे (API) टॅबलेट्स, कॅप्सूल आणि सिरप बनवण्यासाठीचा कच्चा माल असतो. ड्रग्ज टेक्निकल अॅडवायझरी बोर्डानं (DTAB) जून 2019 मध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. शाकाहारी लोकांची प्रोटीनची गरज होईल सहज पूर्ण; आहारात घ्या या 7 गोष्टी क्यूआर QR कोड म्हणजे काय? क्यूआर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स. एखादी माहिती तात्काळ वाचता यावी यासाठी कोड तयार केला जातो. याला बारकोडचं अपग्रेड व्हर्जनही म्हणता येईल. एका अहवालानुसार देशातील 40 टक्के औषधे निकृष्ट दर्जाची आहेत. आता भारतीय कंपन्या API साठी मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहेत. QR कोड कॉपी करणे अशक्य आहे, कारण तो प्रत्येक बॅच नंबरसह बदलेल. यामुळे देशाला बनावट औषधांपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळेल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Generic medicine, Medicine

    पुढील बातम्या