Home /News /career /

कोरोनाकाळात घरबसल्या करा हे टॉप कोर्सेस आणि राहा अपडेट; मिळेल भरघोस पगार

कोरोनाकाळात घरबसल्या करा हे टॉप कोर्सेस आणि राहा अपडेट; मिळेल भरघोस पगार

आज आम्ही तुम्हाला असे काही टॉप ऑनलाईन कोर्सेस सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही स्वतःला अपडेट करू शकता

    मुंबई, 31 जुलै: कोरोनाकाळात प्रत्येकजण घरी राहून काम (Work From home) करत आहे. ज्यांचं काम घरूनच आहे असे लोकं अनेकदा मोकळ्या वेळात नक्की काय करायचं याबाबत चिंतेत असतात. तसंच घरूनच काम असल्यामुळे बाहेरच्या कॉर्पोरेट जगाशी (Corporate world) येणार संबंधही कमी झाला आहे. यामुळे काही जण तणावात आहेत तर काही जणांना करिअरमध्ये (Career Options) पुहे काय करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही टॉप ऑनलाईन कोर्सेस (Top Online Courses) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही स्वतःला अपडेट करू शकता आणि तसंच तुमच्या करिअरमध्ये समोर जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया. आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्र आयटी आणि सॉफ्टवेअर (IT & Software) क्षेत्र येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था आणि नोकरीच्या बाजारात वर्चस्व गाजवतील. उमेदवारांनी संगणक विज्ञान (Computer science), सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा कोणत्याही संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी पूर्ण केलेली असावी. त्यानंतर या क्षेत्रामध्ये काही लहान मोठे ऑनलाईन कोर्सेस करून तुम्ही तुमच्या जॉबमध्ये प्रमोशन्स मिळवू शकता. तसंच चांगल्या पगारच दुसरा जॉबही मिळवू शकता. हे वाचा - विद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक; आताच बघा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस देशात आणि परदेशातील जवळजवळ सर्व कंपन्यांमध्ये तज्ञ डिजिटल मार्केटिंग (Digital marketing) व्यवस्थापकांची सतत मागणी असते. यासाठी अनेक ऑनलाईन लर्निंग साईट्स वर अनेक डिजिटल मार्केटिंगचे प्रमाणपत्र कोर्सेस असतात. हे कोर्सेस करून तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता. तज्ञ डिजिटल मार्केटिंग मॅनेजरचं वार्षिक सरासरी वेतन 15 लाख - 20 लाख रुपये आहे. काही मोठ्या कंपन्यांमध्ये सुरुवातीला 8 लाख. हे वार्षिक वेतन पॅकेज रु. 40 लाखांपर्यंत पोहोचू शकतात. ऑनलाईन कन्टेन्ट रायटर आजकाल इंटरनेट आणि डिजिटल युगात ऑनलाईन कंटेंट रायटर्स (Online Content Writer) / टेक्निकल रायटर्सना खूप मागणी आहे आणि सर्व भाषांचे भाषा तज्ञ या व्यवसायात खूप चांगले सामील होऊ शकतात. यात करिअरच्या वाढीसाठी खूप आशादायक शक्यता आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Online

    पुढील बातम्या