जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नोकरी बदलताय? मग नोटीस पीरियडबद्दल माहिती हव्यातच 'या' गोष्टी...

नोकरी बदलताय? मग नोटीस पीरियडबद्दल माहिती हव्यातच 'या' गोष्टी...

नोकरी बदलताय? मग नोटीस पीरियडबद्दल माहिती हव्यातच 'या' गोष्टी...

नोटीस पीरियड प्रत्येक कंपनीत वेगवेगळा असू शकतो. हा कालावधी 15 दिवसांपासून तीन महिन्यांपर्यंत कितीही असू शकतो.

    पूर्वीच्या काळी वर्षानुवर्षं एकाच ठिकाणी नोकरी करण्याचा ट्रेंड होता. किंबहुना असेही अनेक कर्मचारी असत की, जे करिअरच्या सुरुवातीला जिथे नोकरीला लागत, तिथूनच निवृत्त होत. आता मात्र काळानुसार या ट्रेंडमध्ये बदल (Changing Job) झाला आहे. नोकऱ्या बदलणं ही काही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. किंबहुना एखादा कर्मचारी अनेक कंपन्यांमध्ये नोकरी करून आला असेल, तर त्याला चांगला अनुभव आहे, असं समजून पुढच्या संधीही चांगल्या मिळत जातात. नोकरी बदलायचं निश्चित झालं, की ज्या काही तांत्रिक गोष्टी असतात, त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटीस पीरियड. आपण ज्या कंपनीत काम करत असतो, तिथे राजीनामा दिला तर आपल्याला कंपनीच्या नियमांनुसार ठरावीक दिवसांचा नोटीस पीरियड पूर्ण करावा लागतो. त्याबद्दलच्या नियमांची माहिती करून घेऊ या. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कर्मचारी जेव्हा कोणत्याही कंपनीत नोकरी सुरू करतो, तेव्हा त्याचं कंपनीशी एक काँट्रॅक्ट (Contract to Company) होतं. त्या काँट्रॅक्टमध्ये कंपनीचे सगळे नियम आणि अटी लिहिलेल्या असतात. कर्मचाऱ्याला कोणते अधिकार, रजा, सुट्ट्या आहेत, अन्य कोणत्या सुविधा, सवलती आहेत या गोष्टींचीही माहिती त्यात असते. जेव्हा कर्मचारी नोकरी स्वीकारताना त्यावर सही करतो, तेव्हा त्यातले सर्व नियम पाळणं कंपनी आणि कर्मचाऱ्याला बंधनकारक असतं. त्यामुळे त्यातच दिलेले नोटीस पीरियडबद्दलचे नियमही पाळावे लागतात. नोटीस पीरियड प्रत्येक कंपनीत वेगवेगळा असू शकतो. हा कालावधी 15 दिवसांपासून तीन महिन्यांपर्यंत कितीही असू शकतो. प्रोबेशनवरच्या कर्मचाऱ्यांच्या नोटीस पीरियडचा कालावधी कमी, तर पे-रोलवरच्या कर्मचाऱ्यांचा नोटीस पीरियड जास्त असतो. (Cholesterol चांगलं की वाईट कसं ठरतं? बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर काय करायचं?)

    कंपनीने ठरवलेल्या नोटीस पीरियडपेक्षा कमी कालावधीचा नोटीस पीरियड सर्व्ह करायचा असेल तर कोणते नियम असतात, तेही काँट्रॅक्टमध्ये दिलेले असतात. मुळात नोटीस पीरियड ही संकल्पना अशासाठी राबवली जाते, की त्या काळात कंपनीला सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामाची व्यवस्था पाहणारा नवा कर्मचारी शोधता यावा किंवा त्याच्या कामाच्या जबाबदारीची व्यवस्था दुसऱ्या कोणाकडे तरी देता यावी. अर्थात, सर्व कंपन्यांना नोटीस पीरियड असल्याने नव्या कंपनीत जॉयनिंगची तारीख ठरवण्यापूर्वी ती कंपनीही आधीच्या कंपनीचा नोटीस पीरियड किती हे विचारून घेते. त्यामुळे नोटीस पीरियड पूर्ण करण्यात शक्यतो काही अडचण येत नाही.

    तरीही काही कारणाने कर्मचाऱ्याला नोटीस पीरियड (Notice Period) पूर्ण करायचा नसेल किंवा करता येत नसेल, तर त्यासाठीही काही नियम कंपनीने केलेले असतात. त्या नोटीस पीरियडच्या बदल्यात पगारात आपल्या न घेतलेल्या रजा काउंट करता येऊ शकतात किंवा त्या पीरियडच्या ऐवजी कंपनीला त्या कालावधीच्या पगाराचे पैसे कर्मचाऱ्याने द्यावे लागतात. हे पैसे किती असतील हे प्रमाण कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीवर (Basic Salary) अवलंबून असतं. शिवाय याचे नियम प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळे असतात. बारीकसारीक नियम जाणून घेण्यासाठी कर्मचाऱ्याला एचआर विभागाशी बोलावं लागतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात