मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मंगळ ग्रहावर कसा होतो सूर्यास्त? NASA ने पहिल्यांदा शेअर केला अद्भुत फोटो

मंगळ ग्रहावर कसा होतो सूर्यास्त? NASA ने पहिल्यांदा शेअर केला अद्भुत फोटो

'नासा'च्या संशोधकांनी आता मंगळ ग्रहावरून सूर्यास्त (Sunset from Mars) कसा दिसतो, हे दाखवणारा अद्भुत फोटो (Mars Sunset picture) प्रसिद्ध केला आहे.

'नासा'च्या संशोधकांनी आता मंगळ ग्रहावरून सूर्यास्त (Sunset from Mars) कसा दिसतो, हे दाखवणारा अद्भुत फोटो (Mars Sunset picture) प्रसिद्ध केला आहे.

'नासा'च्या संशोधकांनी आता मंगळ ग्रहावरून सूर्यास्त (Sunset from Mars) कसा दिसतो, हे दाखवणारा अद्भुत फोटो (Mars Sunset picture) प्रसिद्ध केला आहे.

नवी दिल्ली 25 नोव्हेंबर : सूर्यास्तावेळी हळू-हळू नजरेआड जाणारा सूर्य आणि तेव्हा आकाशात झालेली रंगांची उधळण हे दृश्य अगदीच मनमोहक असतं. बरेच हौशे-नवशे फोटोग्राफर विविध ठिकाणांवरून हे सूर्यास्ताचं दृश्य आपल्या कॅमेऱ्यात (Sunset pictures) टिपत असतात. हिल स्टेशन्सवर तर खास सूर्यास्त पाहण्यासाठी सनसेट पॉइंट्सही (Sunset Points) असतात. पृथ्वीच्या विविध ठिकाणांवरून सनसेट कसा दिसतो हे तर आपण प्रत्यक्ष आणि इंटरनेटवरही पाहिलंच असेल; पण आपल्या सूर्यमालेतल्या अन्य ग्रहांवरून (Sunset from other planets) सूर्यास्त कसा दिसतो याचा कधी विचार केलाय?

आपण याबाबत विचार केला नसला, तरी 'नासा'च्या (NASA) संशोधकांनी मात्र नक्कीच केला होता. त्यामुळेच 'नासा'च्या संशोधकांनी आता मंगळ ग्रहावरून सूर्यास्त (Sunset from Mars) कसा दिसतो, हे दाखवणारा अद्भुत फोटो (Mars Sunset picture) प्रसिद्ध केला आहे. मंगळावर आपल्याकडे आहे तसं वातावरण नसलं, तरीही तिथला सूर्यास्तदेखील पृथ्वीवरच्या सूर्यास्तासारखाच मनमोहक आहे.

हा फोटो 'नासा'ने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून (Nasa Instagram) शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये (Nasa captures Sunset on Mars) ते म्हणतात, “लाल ग्रहावरचा एक निळा सूर्यास्त. आमच्या पर्सीव्हीरन्स मार्स रोव्हरने (Perseverance Mars Rover) पहिल्यांदाच सूर्यास्ताचं छायाचित्र टिपलं आहे.” या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो 9 नोव्हेंबर 2021 रोजी टिपण्यात आला आहे. मास्टकॅम-झेड या कॅमेरा सिस्टीमच्या साह्याने हा फोटो घेण्यात आला आहे. हा फोटो पहिल्यांदाच समोर आला असला, तरी 1970च्या दशकापासूनच नासा मंगळावरच्या सूर्यास्ताचं (Nasa Sunset on Mars) अवलोकन करत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. पर्सीव्हीरन्स रोव्हरने आपल्या मिशनच्या 257व्या दिवशी हे छायाचित्र टिपलं आहे.

View this post on Instagram

A post shared by NASA (@nasa)

पृथ्वीवरचं वातावरण विविध वायूंपासून बनलं आहे. त्यामुळे आपल्याकडे एरव्ही निळं दिसणारं आकाश सूर्यास्तावेळी मात्र सोनेरी आणि विविध रंगांमध्ये दिसते. मंगळावरचं वातावरण पृथ्वीपेक्षा निराळं असल्यामुळे तिथल्या धुळीमुळे सूर्यास्तावेळी आकाश एका विशिष्ट निळ्या (Why Mars Sunset is blue) रंगाचं दिसतं, असंही 'नासा'ने स्पष्ट केलं.

मंगळावर जीवन आहे की नाही, याचा शोध गेल्या कित्येक वर्षांपासून नासाचे वैज्ञानिक (NASA Scientists) घेत आहेत. तसंच, टेक जायंट इलॉन मस्कही (Elon Musk) मंगळावर मानवी वसाहत सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे भविष्यात कधी आपण मंगळावर राहायला गेलो, तर तिथेही आपल्याला पृथ्वीप्रमाणेच सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेता येणार आहे, हे नक्की!

First published:

Tags: Mars, Nasa