जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नाईट शिफ्ट करताय? महिलांनो आत्ताच व्हा सावध, रात्रीचं जागरण हिरावून घेईल तुमचं मातृत्व!

नाईट शिफ्ट करताय? महिलांनो आत्ताच व्हा सावध, रात्रीचं जागरण हिरावून घेईल तुमचं मातृत्व!

महिलांमध्ये जागरणामुळे अनेक समस्या उद्भवतात. मात्र आता संशोधकांनी असा दावा केला आहे की, नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांना गर्भधारणा होण्यास अडथळे येऊ शकतात.

महिलांमध्ये जागरणामुळे अनेक समस्या उद्भवतात. मात्र आता संशोधकांनी असा दावा केला आहे की, नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांना गर्भधारणा होण्यास अडथळे येऊ शकतात.

जसे पुरुष वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. तसेच आता महिलाही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात, त्यात नाईट शिफ्टदेखील आलीच.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 28 मे : हल्ली महिला प्रत्येक क्षेत्रात काम करतात. वेळेचंही बंधन महिलांना आता नसतं. जसे पुरुष वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. तसेच आता महिलाही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात, त्यात नाईट शिफ्टदेखील आलीच. आयटी क्षेत्रात महिलांनी नाईट शिफ्ट करण्याचं प्रमाण जास्त आहे. मात्र महिलांच्या आरोग्य समस्या पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. पुरुष आणि महिला दोघेही नाईट शिफ्ट करत असले तरी या रात्रीच्या कामाचा महिलांच्या आरोग्यावर जास्त परिणाम होतो. महिलांमध्ये जागरणामुळे अनेक समस्या उद्भवतात. मात्र आता संशोधकांनी असा दावा केला आहे की, नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांना गर्भधारणा होण्यास अडथळे येऊ शकतात. म्हणजेच नाईट शिफ्ट महिलांच्या आई होण्याच्या मार्गातील अडथळा बनू शकते. पाहूया कसे… लोकमत या वृत्तपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, 25 व्या युरोपियन एंडोक्रायोनोलोजी कॉंग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या शोधप्रबंधात मांडण्यात आला. यामध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला की, ‘कामाच्या आणि झोपेच्या अनियमित वेळांचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.’ प्रकाशातील चढउतारानुसार मानवी शरीराचे काम सुरु असते. दिवसाच्या २४ तासांमध्ये यावरूनच माणसाच्या झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित होते. तसेच हार्मोन्सचे स्रवण, पचनक्रिया या प्रक्रिया सुरू असतात. मात्र हल्ली बरेच लोक नाईट शिफ्ट करतात. यामुळे झोपण्याच्या वेळी जागे राहावे लागते आणि आपसूकच त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आय. व्ही. एफ. तज्ज्ञ, डॉ. अमित पत्की लोकमतला सांगितले की, “नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्याचे दिसते. स्त्रीबीज निर्मितीसाठी महिलांच्या मेंदूच्या मध्यवर्ती भागात असणारी पिनियल ग्रंथी उत्तेजित होणे आवश्यक असते आणि यासाठी महिलांना सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते. मात्र रात्री काम करणाऱ्या महिलांना सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्यामुळे गुणवत्तापूर्ण स्त्रीबीज तयार होत नाही. गुणवत्तापूर्ण स्त्रीबीज तयार न झाल्यामुळे गर्भधारणेत अडथळे निर्माण होतात. तसेच नाईट शिफ्टमुळे ल्युटेनिझिंग हार्मोन्सवर सुद्धा परिणाम होतो. ल्युटेनिझिंग हार्मोन पिट्युटरी ग्रंथीद्वारे तयार केले जाते, जे चांगल्या स्त्रीबीजासाठी आवश्यक असते. ल्युटेनिझिंग हार्मोनची पातळी कमी जास्त झाल्यास त्याचा थेट परिणाम स्त्रीबीजाच्या गुणवत्तेवर होतो. स्त्रीबीज चांगले नसेल तर प्रजनन क्षमतेवर त्याचा होतो आणि यामुळे गर्भधारणेमध्ये अडथळे निर्माण होतात. चांगल्या स्त्रीबीजाच्या निर्मितीसाठी मेलॅटोनिन हार्मोनदेखील खूप आवश्यक असते, ज्याचे स्त्रवण अंधारात चांगल्या प्रकारे होते. मात्र ज्या महिला नाईट शिफ्ट करतात किंवा रात्री लाईट सुरु ठेऊन झोपतात. त्यांच्यामध्ये या हार्मोनचे स्रवण होत नाही आणि त्याचा थेट परिणाम स्त्रीबीजाच्या गुणवत्तेवर होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात