जन्मानंंतर ना ते रडलं, ना त्याचं हृदय धडधडलं; अखेर 11 मिनिटांनी बाळाने घेतला पहिला श्वास

जन्मानंंतर ना ते रडलं, ना त्याचं हृदय धडधडलं; अखेर 11 मिनिटांनी बाळाने घेतला पहिला श्वास

Baby first breath after 11 minutes - जगात पाऊल ठेवताच चिमुकल्या जीवाची जीवनमृत्यूशी झुंज सुरू झाली.

  • Share this:

बंगळुरू, 11 मे : कोरोना काळात कित्येक कोरोना रुग्णांचा प्रत्येक श्वासासाठी लढा सुरू आहे. याचदरम्यान एका बाळाला मात्र जन्माला येताच श्वासासाठी लढावं लागलं. जगात पाऊल ठेवताच त्याची जीवनमृत्यूशी झुंज सुरू झाली. ना ते रडत होतं, ना त्याच्या हृदयाची धडधड होती, ना ते श्वास घेऊ शकत होतं. सामान्यपणे जिवंत असण्याची जी लक्षणं असतात अशी कोणतीच लक्षणं त्याच्यात दिसत नव्हती. पण या चिमुकल्याने हार मानली नाही. त्यानेही या परिस्थितीचा सामना केला. 11 मिनिटांनी त्याने आपला पहिला श्वास घेतला (Baby first breath after 11 minutes).

कर्नाटकच्या बंगळुरूमधील रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये (Rainbow Children Hospital) जन्माला आलेलं बाळ (Karnataka baby). सामान्यपण बाळ जन्मलं की ते ट्याँह ट्याँह करत रडतं. पण हे बाळ मात्र रडेनाच. डॉक्टरांनी नवजात बालकांच्या जन्मानंतर ज्या चाचण्या करतात त्या केल्या तर त्यात  त्याच्या हृदयाचे ठोकेही सुरू नव्हते आणि तो श्वासही घेत नव्हता.

रुग्णालयातील सल्लागार डॉ. प्रदीप कुमार यांनी सांगितलं, "बाळ तसं सामान्यपणे जन्माला आलं होतं. पण त्याचं अपगर स्कोअर (APGAR score) खूप खराब होतं"

अपगर स्कोअर की बाळाच्या जन्मानंतर केली जाणारी टेस्ट आहे. यामध्ये बाळाच्या हृदयाची गती, स्नायून आणि इतर सर्व बाबींची तपासणी केली जाते. बाळाला आपात्कालीन देखभालीची गरज तर नाही ना हे पाहण्यासाठी ही टेस्ट केली जाते. सामान्यपणे ही टेस्ट जन्माच्या एक मिनिटानंतर आणि पाच मिनिटांनंतर अशी दोनदा केली जाते.

हे वाचा - प्रेग्न्सीत कोरोना लस किती सुरक्षित? 18 कोरोना लसीकरण सुरू होताच नवी माहिती

"त्याची स्थिती पाहून आम्ही नवजात पुनर्जीवन तंत्रज्ञानाचा (newborn resuscitation technique) वापर केला, ज्यामुळे एका मिनिटांतच बाळाच्या हृदयाचे ठोके वाढले पण त्याने आपला पहिला श्वास 11 मिनिटाने घेतला", असं डॉ. कुमार म्हणाले.

या बाळाला दुसऱ्या टप्प्यातील हाइपोक्सिक इस्केमिक एन्सेफॅलोपॅथी ( Stage-2 Hypoxic Ischemic Encephalopathy) असल्याचं निदान झालं.

डॉ. कुमार यांनी सांगितलं, "ही खूप दुर्मिळ समस्या आहे. फक्त दोन टक्के बालकांमध्येच दिसून येते पण 20 टक्के बालकांचा मृत्यू होतो.  आईपासून प्लेसेंटा आणि बाळाला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्याने, बाळाला बिघडलेलं ऑक्सिकरण, प्लेसेंटाजवळील गॅस एक्सचेंज कमी होणं आणि गर्भाची ऑक्सिजनची गरज वाढणं यामुळे प्रिनेटल एस्फिक्सिया होतं"

हे वाचा - Salute! चिमुरड्यांसह आई-वडिलांनाही झाला संसर्ग, तरी डॉक्टर आई बजावतेय कर्तव्य

रिपोर्टनुसार बाळाला बरं करण्यासाठी हाइपोथर्मिया (Therapeutic Hypothermia method) पद्धतीचा अवलंब करण्यात आला आला. याला कूलिंग थेरेपीही (whole body cooling method) म्हटलं जातं.

निओनेटोलॉजी आणि पेडियाट्रिक्स डॉ. सुषमा कल्याण अचुता यांनी सांगितलं, "बाळाला 72 तास थंड करण्यात आलं आणि हळूहळू 12 तासांपेक्षा जास्त वेळ पुन्हा थोडी उष्णता देण्यात आली. बाळाची प्रकृती आता उत्तम आहे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे"

Published by: Priya Lad
First published: May 11, 2021, 5:18 PM IST

ताज्या बातम्या