जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आश्चर्य! 4 पाय आणि 4 हातांचं बाळ; 'देवाचा अवतार' समजतायेत लोक, पण डॉक्टर म्हणाले...

आश्चर्य! 4 पाय आणि 4 हातांचं बाळ; 'देवाचा अवतार' समजतायेत लोक, पण डॉक्टर म्हणाले...

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

चार हात आणि चार पायांच्या बाळाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 05 जुलै : सामान्यत: माणसाला दोन हात आणि दोन पाय असतात. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या एका बाळाला पाहून सर्वच जण आश्चर्यचकित (Everyone Surprised) झाले आहेत. या बाळाला चक्क चार पाय आणि चार हात (Four Legs and Four Arms Child) आहेत. त्यामुळे कुणी हा नैसर्गिक चमत्कार म्हटलं आहे तर कुणी याला देवाचा अवतार मानलं आहे. पण डॉक्टरांनी यामागील सत्य सांगितलं आहे. हरदोईतील शाहबाद कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये 2 जुलै रोजी एका विचित्र बाळाचा जन्म झाला. या बाळाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते आहे. या बाळाचं जन्मावेळी वजन जवळपास 3 किलो होतं. बाळ तसं पूर्णपणे निरोगी आहे, पण त्याला 4 हात आणि 4 पाय आहेत. या बाळाबाबत समजताच लोकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली आहे. हा देवाचा अवतार आहे, असं सर्वजण म्हणत आहेत. पण डॉक्टरांच्या मते हे जुळं होतं.. पण दुसऱ्या बाळाचं शरीर नीट विकसित झालं नाही, त्यामुळे एका बाळाला अतिरिक्त हातपाय आले. हे वाचा -  OMG! आईच्या पोटातून बाहेर आलं असं बाळ; डिलीव्हरी करणारे डॉक्टरही हादरले आज तक च्या रिपोर्टनुसार आरोग्य अधिकारी डॉ. रमेश बाबू यांनी सांगितलं की, हे जुळ्यांचं प्रकरण आहे. बाळाच्या पोटावर दुसऱ्या बाळाचं धड जोडलेलं असल्याचं दिसतं आहे. पण हे पूर्णपणे विकसित झालं नाही. बिहारमध्येही चार हातापायांची मुलगी बिहारच्या नवाडा येथील अडीच वर्षांची चिमुकलीही काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती.  या मुलीला तिच्या पालकांनी उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले तेव्हा तिला पाहून डॉक्टरांना देखील आश्चर्यचा धक्का (Doctors Shocked) बसला. ही मुलगी जन्मापासून दिव्यांग असल्याचे तिच्या पालकांनी सांगितलं. या मुलीच्या पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे. तिचे वडील मोलमजुरी करून घर चालवलात. आपल्या मुलीवर मोठा रुग्णालयात उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे ते आतापर्यंत तिच्यावर उपचार करू शकलेले नाहीत. हे वाचा -  धक्कादायक! 2 महिन्यांच्या चिमुकल्याचं आईनेच फाडलं पोट; भूत म्हणून खेचून बाहेर काढल्या आतड्या पैसे नसल्याने डॉक्टरांनी या मुलीवर उपचार (Child Treatment) करण्यास नकार दिला.  येथील स्थानिक लोकांनी या मुलीच्या पालकांना योग्य उपचार व्हावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात