मुंबई, 29 डिसेंबर : वर्षाच्या शेवटचा महिना (last month of the year) असणारा डिसेंबर (December) संपण्यास अवघे तीन दिवस राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासोबतच नवीन वर्षाचे (new year 2022) स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज होतायत. कोरोनाचं सावट असलं तरीही यंदा कोरोना (corona) अनुषंगाने असणाऱ्या नियमावलीचं पालन करत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याची तयारीही सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, 1 जानेवारीलाच (January) नवीन वर्ष का सुरू होतं? आज आम्ही तुम्हाला यामागचा इतिहास (history) सांगणार आहोत. 1 जानेवारीला नवीन वर्ष जगभर साजरं केलं जातं.आज तुम्हाला आम्ही नवीन वर्ष 1 जानेवारीलाच का साजरं केलं जातं, याची माहिती देणार आहोत. 1 जानेवारीला खरं तर ग्रेगरियन कॅलेंडरनुसार (Gregorian calendar) नवीन वर्ष सुरू होतं. या कॅलेंडरशिवाय विविध प्रकारची कॅलेंडरदेखील तुम्ही पाहिली असतील. परंतु, नवीन वर्ष ग्रेगरियन कॅलेंडरनुसार जगभरात साजरं केलं जातं. हे कॅलेंडर 1582 मध्ये सुरू झालं. या कॅलेंडरपूर्वी रशियाचं ज्युलियन कॅलेंडर प्रचलित होतं. त्या कॅलेंडरमध्ये 10 महिने होते आणि कॅलेंडरनुसार ख्रिसमस हा सण दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येत होता. 15 ऑक्टोबर 1582 रोजी अमेरिकेतील अलॉयसियस लिलियसने ख्रिसमस या सणासाठी एक तारीख निश्चित करण्यासाठी ग्रेगरियन कॅलेंडर सुरू केलं. आजतक ने याबाबत वृत्त दिलयं. वाचा : New Year 2022 Vastu Tips: नवीन वर्षापूर्वीच घरात आणा या वस्तू, वास्तू दोष दूर होऊन नशीब चमकेल कोणतंही कॅलेंडर हे सूर्य किंवा चंद्राच्या भ्रमणाच्या चक्राच्या गणनेवर आधारित असतं. चंद्र चक्रावर आधारित कॅलेंडरमध्ये 354 दिवस असतात. तर सूर्यचक्रावर तयार केलेल्या कॅलेंडरमध्ये 365 दिवस आहेत. ग्रेगरियन कॅलेंडर सूर्य चक्रावर आधारित आहे. या कॅलेंडरनुसार जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना असतो. तर ख्रिसमसनंतर डिसेंबरमध्ये वर्ष संपतं. या कॅलेंडरमध्ये दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस निश्चित करण्यात आला आहे. वर्ष 2021 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. वर्ष 2022 चे स्वागत हटके करण्यासाठी विविध प्लॅन तयार करण्यास प्राधान्य दिलं जातंय. नवीन वर्षानिमित्त अनेकांनी पर्यटनाला जाण्याचा सुद्धा बेत आखला आहे. काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलयं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करणं गरजेचं आहे. नियमावलीचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने सरकार, प्रशासन यांचीही तयारी सुरू असताना दिसतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.