नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : नवीन वर्षात प्रत्येकाला बरंच काही चांगलं होण्याच्या अपेक्षा असतात. येणारं नव्या वर्षाची सुरुवातच फक्त आपल्यासाठी आनंदाची नाही तर, वर्षारंभापासून वर्षाअखेरीपर्यंत आपल्या घरात सुख-समृद्धी टिकून रहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या आशेनं येणारं वर्ष चांगलं जाण्यासाठी लोक किती उपाय करतात, याचा विचारही करणं शक्य नाही. यात ज्योतिष, वास्तुशास्त्र, शुभ समजल्या वस्तू यांचाही समावेश केला जातो 2022 साल येण्यासाठी आता फक्त काही काळ (New Year 2022 Vastu Tips) उरला आहे.
वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू शुभ मानल्या जातात आणि त्या आणल्यानं नशिबाचे दरवाजे उघडू शकतात, अशी अनेकांची धारणा असते, ते जाणून घेऊया.
धातूचे कासव
बरेच लोक त्यांच्या घरात कासव ठेवतात. परंतु, बहुतेक ते माती किंवा लाकडापासून बनवलेलं असतं. घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी तुम्ही घरात धातूचं कासव ठेवू शकता. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही पितळ, कांस्य किंवा चांदीचं कासव तुमच्या घरी आणू शकता. याच्यामुळं तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यास मदत होईल, असं मानलं जातं.
चांदीचा हत्ती
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घरात चांदीचा हत्तीदेखील ठेवू शकता. पण हा हत्ती घन चांदीचा असावा. वास्तुशास्त्रानुसार याचा घरावर खूप चांगला प्रभाव पडतो आणि राहू आणि केतूचा वाईट प्रभाव संपुष्टात येऊ लागतो. चांदीचा हत्ती घरात ठेवल्यानं व्यवसायात वृद्धी होते आणि नोकरीत प्रगती होते. यासोबतच घरात सुख-शांती आणि समृद्धी राहते.
मोरपीस
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घरात मोराची पिसे देखील ठेवू शकता. मोरपीस अतिशय शुभ आणि चमत्कारिक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, मोराची पिसं घरात ठेवल्यानं नशिबाच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतात. परंतु एकाच वेळी अनेक मोराची पिसं घरात ठेवण्याऐवजी फक्त एक ते तीन मोराची पिसं घरात ठेवावीत, असं म्हटलं जातं.
मोत्याचं कवच असलेला शिंपला
नवीन वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या घरात मोती शिंपल्यालाही स्थान देऊ शकता. मोतीशिंपल्याची विधीपूर्वक पूजा करून तिजोरीत किंवा पैसा ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यानं घरामध्ये धन-संपत्तीचा वास राहतो. त्यामुळे व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते आणि धनलाभ होतो, असं सांगितलं जातं.
हे वाचा - Cancer : कॅन्सरमुळे अंगावरील तीळाचा असा बदलतो रंग, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती
पोपट
तुम्ही तुमच्या घरात पोपटाचं चित्र किंवा मूर्तीदेखील ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पोपटाचं चित्र लावल्यानं घरात सुख-समृद्धी येते. यासोबतच मुलांची अभ्यासातही रुची वाढते आणि नशिबाचे दरवाजे उघडू लागतात, असं काहीजण म्हणतात.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.