मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /राकेश झुनझुनवाला बांधतायत 14 मजली अलिशान घर, वर्णन वाचून व्हाल थक्क

राकेश झुनझुनवाला बांधतायत 14 मजली अलिशान घर, वर्णन वाचून व्हाल थक्क

बिग बुल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं नवं अलिशान घर सध्या तयार होत आहे. जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्यं

बिग बुल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं नवं अलिशान घर सध्या तयार होत आहे. जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्यं

बिग बुल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं नवं अलिशान घर सध्या तयार होत आहे. जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्यं

मुंबई, 6 जानेवारी: भारतातील कोट्यधीश (Billionare) आणि शेअर बाजारात ‘बिग बुल’ (Big Bull) नावाने ओळखले जाणारे उद्योगपती राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) एक अलिशान घर (Lavish home) बांधत आहेत. हे घर असणार आहे 14 मजली (14 floor) आणि त्यात अनेक सुविधा (Facilities) असणार आहेत. मुंबईतील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरात हा महाल बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. राकेश झुनझुनवालांनी ही जागा खरेदी केली असून त्यावर असणारं मूळ बांधकाम पाडून तिथं नवा महाल बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

विकत घेतली जागा

मलबार हिल परिसरातील बी.जी. खेर मार्गावर एक इमारत होती. त्यात 14 फ्लॅट्स होते. ही इमारत राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी 371 कोटी रुपयांना विकत घेतली. आता ही इमारत पूर्ण पाडून त्या जागी नवी इमारत उभी करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. एकूण 2700 चौरस फूट जागेत 57 मीटर उंची असणारी इमारत बांधली जाणार आहे.

अशी असेल रचना

राकेश झुनझुनवाला यांच्या नव्या घरात एका मजल्यावर बँक्वेट हॉल, एका मजल्यावर स्वीमिंग पूल, एका मजल्यावर जिम, एका मजल्यावर होम थिएटर यासारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. इमारतीतल सर्वात वरच्या मजल्यावर 70.24 स्क्वेअर फुटाचा कंजर्वेटरी एरिया, री-हिटींग किचन, पिज्जा काउंटर अशा सुविधा असणार आहेत.

हे वाचा- मुंबई लोकल बंद होणार? जिल्हाबंदी होणार की lockdown? आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं...

बाराव्या मजल्यावर असणार ‘बिग बुल’

स्वतः राकेश झुनझुनवाला हे बाराव्या मजल्यावर राहणार असून आपली पत्नी रेखा यांच्यासोबत सर्व कारभार तिथूनच पाहणार आहेत. या मजल्यावर अलिशान बेडरूम, वेगवेगळे बाथरूम, ड्रेसिंग रूम आणि एल शेपची लिव्हिंग रुम तयार होणार असल्याचं ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या बातमीत म्हटलं आहे.

First published:

Tags: 26/11 mumbai attack, Home-decor, Malbar hill, Real estate