जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / महिलांनी 'या' गोष्टी Gynecologist पासून लपवणं ठरु शकतं धोक्याचं

महिलांनी 'या' गोष्टी Gynecologist पासून लपवणं ठरु शकतं धोक्याचं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लैंगिक समस्या ही अशी समस्या आहे, ज्यावर बहुतेक महिला मोकळेपणाने बोलू शकत नाहीत आणि त्यांच्या समस्या डॉक्टरांनाही सांगण्यास घाबरतात किंवा त्यांना लाज वाटते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई २४ नोव्हेंबर : असे अनेक लोक आहेत, जे आजारी पडल्यावर डॉक्टरकडे न जाता घरगुती उपचार करत असतात. काही आजार ही घरगुती उपचारांनी बरे होतात, पण सगळेच उपचार ठिक होत नाहीत. कारण काहीवेळेला त्याची लक्षणे आणि हिस्ट्री काही वेगळीच असते. याशिवाय अशा अनेक महिला आहेत, ज्या आपल्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. महिलांशी निगडीत लैंगिक समस्या ही देखील अशीच एक समस्या आहे, ज्यावर बहुतेक महिला मोकळेपणाने बोलू शकत नाहीत आणि त्यांच्या समस्या डॉक्टरांनाही सांगण्यास घाबरतात किंवा त्यांना लाज वाटते. अनेक वेळा स्त्रिया स्त्रीरोगतज्ञाकडे जातात पण लाजेमुळे त्या त्यांच्या लैंगिक समस्यांबद्दल बोलू शकत नाहीत. त्यामुळे या आजारावर योग्य उपचार होत नाहीत आणि शेवटी ते आजार फार गंभीर होऊन बसतात. हे ही वाचा : विवाहित लोक विवाहबाह्य संबंधांत का अडकतात? ही आहेत ३ मोठी कारणं त्यामुळे स्त्रियांनी त्या डॉक्टरांना सांगायलाच हव्यात. आता त्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या स्त्रियांनी कधीही स्त्रीरोगतज्ञांपासून किंवा गायनॅकपासून लपवू नये. चला सविस्तर माहिती घेऊ. मासिक पाळी संबंधीत गोष्टी जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल, तारखेपेक्षा खूप आधी किंवा उशीरा येत असेल किंवा महिन्यातून दोनदा येत असेल किंवा मासिक पाळीशी संबंधित कोणतीही इतर समस्या असेल तर दुर्लक्ष करू नका आणि स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जा. तुम्हाला मासिक पाळीची समस्या असल्यास, तुम्हाला वंध्यत्व, नैराश्य आणि थायरॉईड यासह अनेक आरोग्य समस्या असू शकतात, त्यामुळे उशीर करू नका आणि स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या किंवा वेदनाशामक औषधांसह इतर कोणतेही औषध घेत असाल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे मासिक पाळीत समस्या येतात. शिवाय शरीर संबंध ठेवताना वेदना होत असतील, तर तुमच्या समस्येबद्दल तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी मोकळेपणाने बोला. तसेच योनीतून रक्तस्रावासह इतर कोणतीही समस्या असल्यास, घरगुती उपाय करू नका आणि स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जा आणि योग्य उपचार करा. योनीतून वास येणे योनीमध्ये खाज सुटणे किंवा तीक्ष्ण दुर्गंधी आल्यास निष्काळजीपणा न करता डॉक्टरांकडे जावे. अशा लैंगिक समस्या संसर्गामुळे होतात, त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि स्त्रीरोगतज्ज्ञांना सांगा. पोटात दुखणे जर तुम्हाला तुमच्या पोटात, पाठीत किंवा कंबरेत असामान्य वेदना होत असतील आणि एक आठवड्यापेक्षा जास्त काळ वेदना होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि उपचारासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जा.

News18लोकमत
News18लोकमत

तुमच्या कोणत्याही लैंगिक समस्यांबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञांशी मोकळेपणाने बोला आणि योग्य वेळी योग्य उपचार घ्या. लैंगिक समस्या हे अनेक रोगांचे कारण आहे, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या समस्या डॉक्टरांना सांगण्याची सवय लावा, म्हणजे तुम्हाला त्यांच्याशी बोलताना लाज वाटणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात