मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पाकिस्तानात आहे देवीचं हे शक्तिपीठ; जगभरातल्या भाविकांसह मुस्लीमही करतात उपासना

पाकिस्तानात आहे देवीचं हे शक्तिपीठ; जगभरातल्या भाविकांसह मुस्लीमही करतात उपासना

Navratri 2020 : पाकिस्तानमध्ये असणाऱ्या या देवीचं मंदिर हिंगलाज माता नावाने प्रसिद्ध आहे. कसं आहे कुठे आहे आणि सध्या काय परिस्थितीत आहे मंदिर? जाणून घ्या.

Navratri 2020 : पाकिस्तानमध्ये असणाऱ्या या देवीचं मंदिर हिंगलाज माता नावाने प्रसिद्ध आहे. कसं आहे कुठे आहे आणि सध्या काय परिस्थितीत आहे मंदिर? जाणून घ्या.

Navratri 2020 : पाकिस्तानमध्ये असणाऱ्या या देवीचं मंदिर हिंगलाज माता नावाने प्रसिद्ध आहे. कसं आहे कुठे आहे आणि सध्या काय परिस्थितीत आहे मंदिर? जाणून घ्या.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

इस्लामाबाद (पाकिस्तान), 23 ऑक्टोबर : कोरोनाच्या (Coronavirus) या संकटकाळात देखील नवरात्राचा (Navratri) उत्सव धुमधड्याक्यात साजरा होताना दिसून येत आहे. देशभरात विविध ठिकाणी हा उत्सव साजरा होत आहे. हिंदू संस्कृतीत आदिमातेची 51 शक्तिपीठं मानली जातात. त्यातली अनेक भारतात देवीची मंदिरं म्हणून प्रसिद्ध आहेत. पण पाकिस्तानातही देवीचं एक ऐतिहासिक मंदिर असून या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात नवरात्रीचा हा सण साजरा केला जात आहे. पाकिस्तानमध्ये असणाऱ्या या देवीचं मंदिर हिंगलाज माता नावाने प्रसिद्ध आहे. या हिंगलाज देवीची उपासना मुस्लीमही करतात. जाणून घ्या या पाकिस्तानातल्या शक्तिपीठाबद्दल...

कुठे आहे हे मंदिर

हे मंदीर हिंगलाज माता नावाबरोबरच नानी मां नावाने देखील प्रसिद्ध आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या हिंगोल नदीजवळील चंद्रकूप पर्वतावर वसलेलं आहे. स्वयंभू स्वरूपातल्या देवीचं हे मंदिर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अतिशय कठीण रस्ता असून भाविक तरीदेखील या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने जात असतात.

हजारो भक्त येतात

नवरात्रात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लीम भाविक येत असतात. यामध्ये सिंधी समुदायाच्या भाविकांची संख्या जास्त असते. छोट्याच्या गुहेत असलेलं हे मंदिर किमान 200 वर्ष जुनं असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी गुहेमध्ये एका छोट्या शिळेची हिंगलाज देवीच्या रूपात पूजा केली जाते.

असं तयार झालं मंदिर

या ठिकाणी असणाऱ्या मंदिराबाबत विविध कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार भगवान शंकर आणि देवी सतीचा विवाह झाल्यानंतर देवी सतीच्या वडिलांनी म्हणजे दक्षाने शंकराचा अपमान केला. त्यामुळे संतापलेल्या देवी सतीने आत्मदहन केलं. त्यावेळी देवीच्या शरीराचे 51 तुकडे झाले होते. तीच 51 शक्तिपीठं. यामधील एक स्थान हिंगलाज देखील असल्याचं मानले जाते. या ठिकाणी देवीचे शिर पडल्याची आस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी देवीचं केवळ शिर असून पूर्ण देवीची मूर्ती नाही.

दुसरी मान्यता अशीही

दुसऱ्या एका पौराणिक मान्यतेनुसार, माता सतीच्या मृत्यूनंतर भगवान शंकर देवीचे मृत शरीर घेऊन तांडव नृत्य करत होते. त्यावेळी भगवान विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्राने देवीच्या शरीराचे 51 तुकडे केले. त्यावेळी याठिकाणी देवीचं शिर येऊन पडल्याची मान्यता आहे.

नानीचे  हज

या ठिकाणी येणारे भाविक सर्वधर्मीय आहेत. याठिकाणी मुसलमान देखील देवीची भक्ती करतात. पाकिस्तानी नागरिकांसाठी हे मंदिर नानीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जगभरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

हे देवीचे शक्तीपीठ खूप प्रसिद्ध असून जगभरातील हिंदू भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. या ठिकाणी 10 फूट लांब असणाऱ्या आगीवरून चालत देवीच्या दर्शनाला येतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता होती. सध्या ही प्रथा संपुष्टात आली असून भाविकांची श्रद्धा मात्र कमी झालेली नाही.

First published:

Tags: Pakistan