मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /30 रुपयांपासून 30 हजारांपर्यंतच्या साड्या... कुठे आहे हे 'मिनी सुरत'

30 रुपयांपासून 30 हजारांपर्यंतच्या साड्या... कुठे आहे हे 'मिनी सुरत'

30 रुपयांपासून 30 हजारांपर्यंतच्या साड्या... हे आहे

30 रुपयांपासून 30 हजारांपर्यंतच्या साड्या... हे आहे

सुरत ही भारतातली मोठी बाजारपेठ आहे; मात्र त्याखालोखाल बिहारमधल्या नालंदा इथलं मार्केटही साड्यांच्या मोठ्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याला मिनी सुरत असंही म्हटलं जातं.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नालंदा : भारतात सध्या अनेक ठिकाणी थंडीची लाट आहे. त्यातच सण-उत्सव, लग्नसराईचे मुहूर्त नसल्यानं बाजारात मंदी आहे. खरेदीसाठी ग्राहकांची पावलं अजून दुकानांकडे वळली नाहीत. आता संक्रांत झाल्यामुळे हळूहळू लग्नाचे मुहूर्त सुरू होतील. त्यामुळे खरेदीला चालना मिळेल. कोणतंही कार्य म्हटलं की जास्तीत जास्त खरेदी होते साड्यांची. सिंथेटिक साड्यांसाठी गुजरातमधलं सुरत ही भारतातली मोठी बाजारपेठ आहे; मात्र त्याखालोखाल बिहारमधल्या नालंदा इथलं मार्केटही साड्यांच्या मोठ्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याला मिनी सुरत असंही म्हटलं जातं. इथे अगदी 30 रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंत साड्यांची व्हरायटी मिळते. त्यामुळे खरेदीसाठी या ठिकाणी नक्की भेट द्या.

  साड्यांसाठी प्रसिद्ध सोहसराय मंडी

  बिहारमध्ये असलेली सोहसराय मंडी अर्थात बाजारपेठ साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. सुरतच्या साडी मार्केटप्रमाणेच इथं साड्यांचं मोठं मार्केट आहे. नालंदा जिल्हा मुख्यालय असलेल्या बिहार शरीफ इथं सोहसराय बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ छोटी असली, तरी इथं साड्यांची भरपूर विविधता आहे. बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेश, बंगाल, झारखंड आणि ओडिशापर्यंतचे व्यापारी इथं साड्या खरेदी करायला येतात. मागणी असेल, तर त्या भागात साड्यांचा पुरवठाही केला जातो. या बाजारपेठेत साड्यांची 250 ते 500 दुकानं आहेत. या दुकानांमध्ये घाऊक आणि किरकोळ दरानं साड्यांची विक्री केली जाते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही साडी बाजारपेठ सुरू झाली. इथे आज काम करणारे व्यापारी गेल्या काही पिढ्यांपासून हा व्यवसाय करताहेत. शेकडो कुटुंबं या व्यवसायावर उदरनिर्वाह करत आहेत.

  वरात घेऊन आला मोठा भाऊ, मात्र छोट्यासोबत केली नवरीची पाठवणी; लग्न मंडपात नेमकं काय घडलं?

  लाखो रुपयांचा नफा

  साडी व्यापारी राम दुलार प्रसाद आणि अशोक कुमार यांच्या म्हणण्यानुसार, या बाजारात जुन्या साड्या खरेदी केल्या जातात. त्या साड्यांना टिकल्या, खडे वगैरे लावून त्यांना नव्यासारखं रूप दिलं जातं व पुन्हा विकल्या जातात. अशा साड्यांची किंमत 30 रुपये ते 100 रुपये इतकी असते. इथल्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नसराईत या बाजारपेठेत दररोज साड्यांची 250 ते 500 बंडलं विकली जातात. नेहमीच्या सीझनमध्ये साड्यांच्या 100 ते 150 बंडल्सची विक्री होते. दर वर्षी या बाजारपेठेत लाखो रुपयांचा नफा कमावला जातो.

  साड्यांसाठी उत्तम पर्याय

  या बाजारात सुती साड्या, सिल्कच्या साड्या, सिंथेटिक साड्या, बनारसी साड्या अशा विविध प्रकारच्या साड्या मिळतात. त्याशिवाय दुल्हन साडी, लेहंगा हेही प्रकार आता मिळतात. लग्न, मुंज अशा कार्यक्रमांसाठी साडी खरेदी करायची असेल, तर बिहारचं हे मिनी सुरत अतिशय उत्तम पर्याय ठरू शकेल. इथं वाजवी दरात साड्यांचे विविध पर्याय उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळेच स्थानिक तसंच इतर घाऊक व्यापाऱ्यांमध्ये नालंदा इथली साड्यांची बाजारपेठ लोकप्रिय आहे.

  First published:

  Tags: Lifestyle, Local18, Saree