• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • थोडंसं काम केल्यावर येणारा थकवा सामान्य नव्हे; तुमचं शरीर देतंय गंभीर आजाराचं संकेत

थोडंसं काम केल्यावर येणारा थकवा सामान्य नव्हे; तुमचं शरीर देतंय गंभीर आजाराचं संकेत

थकव्यासह काही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका,

  • Share this:
मुंबई, 13 जुलै: अंगमेहनतीचं खूप काम केलं तर शरीराला घाम येणं आणि खूप थकवा (Feeling tired) येणं ठिक आहे. पण अगदी थोडं जरी काम केलं तरी थकवा येणं म्हणजे एका गंभीर आजाराचं लक्षण आहे.  चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील हिमोग्लोबीन, कॅल्शियम आदी घटकांचं प्रमाण पुरेसं असणं आवश्यक असतं. हे प्रमाण चांगलं राहण्यासाठी सकस आणि पोषक आहार घेणं गरजेचं असतं, अन्यथा विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. शरीरासाठी अत्यावश्यक असलेल्या आयर्न (Iron) किंवा लोहाची कमतरता जेव्हा जाणवू लागते. तेव्हा त्यास आयर्न डेफिशियन्सी (Iron Deficiency) असं म्हणतात. शरीरात हिमोग्लोबीनची निर्मिती आयर्न करत असतो. तसंच संपूर्ण शरीरातील लाल रक्त पेशींमध्ये (Red Blood Cells) प्रोटीन पोहोचवण्याचं काम देखील लोहाच्या माध्यमातून होत असते. हेल्थ लाइनने दिलेल्या माहितीनुसार, जर शरीरातील आयर्नचं प्रमाण कमी झाले तर पेशी आणि स्नायूंना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकत नाही. यामुळे अॅनिमियाची (Anaemia) समस्या सुरू होऊ शकते. हे वाचा - डिलीव्हरीनंतर महिलांनी जरूर प्यावं हे पाणी; आयुष्यभर होतील फायदे खरं तर, अॅनिमियाचे अनेक प्रकार आहेत. परंतु, सर्वसामान्यपणे दिसून येणारा अॅनिमियाचा त्रास हा आयर्नच्या कमतरतेमुळे होतो. आयर्न डेफिशियन्सीमुळे अशक्तपणा जाणवतो तसंच रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते. परिणाम संसर्ग किंवा आजार होण्याची शक्यता वाढते. आयर्न डेफिशियन्सीचं लक्षण कोणतं आणि ती टाळण्यासाठी काय उपाययोजना करायच्या जाणून घेऊया. आयर्नच्या कमतरतेमुळे ही लक्षणं दिसून येतात आयर्नच्या कमतरतेमुळे सुरुवातीला थकवा (Weakness), डोकेदुखी आणि चक्कर येणं अशी लक्षणं दिसून येतात. अनेकदा श्वास घेण्यास त्रास होणे किंवा बेचैन वाटणं अशाही तक्रारी आढळून येतात. आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळणं किंवा रुक्ष होणं ही समस्या देखील दिसून येते. आयर्नचं प्रमाण कमी झाल्यास चिडचिडेपणा, त्वचा निस्तेज झाल्याचं दिसतं. तसंच नखं पांढरी पडू लागतात. आयर्नच्या कमतरतेमुळे होऊ शकतो हा त्रास - अतिप्रमाणात थकवा जाणवणं - श्वास घेण्यास त्रास होणं - चक्कर येणे किंवा डोकेदुखी - भीती वाटणं हे वाचा - कोरोना काळात मुलांना या डोळ्याच्या आजाराचा धोका; ऐका तज्ज्ञांचा सल्ला - केस कोरडी आणि निस्तेज होणं - तोंडाला कोरड पडणं - पायांमध्ये थकवा जाणवणं - रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणं. आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी हे करा जर तुम्हाला आयर्नची कमतरता जाणवत असेल किंवा तपासणीत तसं दिसून आलं असेल तर तुम्ही दैनंदिन आहारात काळे तीळ, खजूर, गव्हांकुर, शेवगा, बेदाणे, बीट, गाजर आणि अंडी यांचा समावेश करु शकता. त्याव्यतरिक्त मांसहार करणाऱ्या व्यक्ती आपल्या आहारात रेड मीट, मासे आदींचा समावेश करु शकतात. आहारात या अन्नपदार्थांचा समावेश केल्यामुळे काही दिवसांतच तुमची आयर्नची कमतरता दूर होईल. हिरव्या पालेभाज्या आणि फळांमध्येदेखील आयर्न मुबलक असते. शरीरात आयर्न व्यवस्थित शोषले जावे यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त (Vitamin C) आहार पुरेशा प्रमाणात घ्यावा.
First published: