आपल्या देशाची लोकसंख्या ही 130 कोटींहूनही जास्त आहे. पण 2019-20 मध्ये फक्त 5.65 कोटी लोकांनीच कर भरला. अनेक लोकांनी त्यांचं इनकम टॅक्स शून्य दाखवला. शहरांबद्दल बोलायचे झाले तर कर गोळा करण्यात सर्वात पुढे मुंबई शहर आहे. याशिवायही इतर शहरांबद्दल जाणून घेऊ.
देशात सर्वाधिक कर देणाऱ्या शहरांमध्ये आर्थिक नगरी मुंबई अग्रणी आहे. 2019 या चालू वर्षात मुंबईमधून एकूण 3.52 लाख कोटी रुपयांचा कर गोळा करण्यात आला. हा कर गेल्या वर्षाच्या तुलनेत 52 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.
दुसऱ्या स्थानावर दिल्ली शहर आहे. वित्तीय वर्ष 2019 मध्ये दिल्लीकरांनी 1.60 लाख कोटी रुपयांचा कर भरला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 31 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.
तिसऱ्या स्थानावर बंगळुरू हे शहर आहे. वित्तीय वर्ष 2019 मध्ये या शहरातून 1.19 लाख कोटी रुपयांचा कर गोळा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 17 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.
चौथ्या स्थानावर चैन्नई हे शहर आहे. वित्तीय वर्ष 2019 मध्ये या शहरातून 74 हजार कोटी रुपयांचा कर गोळा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 8 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.
पाचव्या स्थानावर हैदराबाद हे शहर आहे. वित्तीय वर्ष 2019 मध्ये या शहरातून 57.3 हजार कोटी रुपयांचा कर गोळा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 9.3 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.