मुंबई, 07 ऑगस्ट: उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम हे करावंच लागतं. तुम्ही नोकरी करत असाल, तर सोमवार पासून शनिवारपर्यंत आणि व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आठवड्यातील सर्वच दिवस काम करावं लागतं. दररोजचं काम, त्यासाठी करावा लागणारा प्रवास, कामाचा ताण इत्यादी गोष्टीमुळं लोकांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. खासकरून मुंबईसारख्या चोवीस तास सुरु असणाऱ्या शहरात आपण आपलं स्वत्वच हरवून बसतो. लोकलमधील गर्दी, रोजची दगदग इत्यादीमुळं माणूस थकून जातो. अशा परिस्थितीत लोकांना सुखानं श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. त्यामुळं कधी एकदा रविवार येतोय आणि कधी आपण रिलॅक्स होतोय, असंच एकंदरीत वाटू लागतं.
या एकदिवसात आपल्याला स्वत:ला रिफ्रेश करायचं असतं आणि सोबतच आपल्या कुटूंबालाही वेळ द्यायचा असतो. अशा परिस्थितीत सिनेमाला जाणं हा एक उत्तम पर्याय तुमच्यासमोर असतो. सिनेमाला गेल्यामुळं तुमचं मनोरंजन होतं आणि आठवड्याचा मानसिक आणि शारीरिक थकवा निघून जातो, त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणी तसेच कुटूंबालाही वेळ देता येतो. जर तुम्ही मुंबईतील अंधेरी भागात असाल आणि चित्रपट पाहण्यासाठी उत्तम थिएटर शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अंधेरीमधील काही प्रसिद्ध थिएटरची यादी तुमच्यासमोर आणणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सिनेमागृह शोधण्यासाठी फार कष्ट घ्यायची गरज पडणार नाही. चला तर जाणून घेऊया अंधेरीजवळच्या प्रसिद्ध सिनेमागृहांची (Famous Movie Theatres near Andheri) यादी…
1.कार्निवल सिनेमा (Carnival Cinemas)-
पत्ता: संगम कॉम्प्लेक्स, No.127, अंधेरी - कुर्ला आरडी, ऍक्मी प्लाझा समोर, डॉ. चरतसिंग कॉलनी, एस बी सिंग कॉलनी, चकाला, अंधेरी ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र 400059
फोन: 077100 97900
2.मूव्हीमॅक्स, अंधेरी पूर्व (MovieMax, Andheri East)-
पत्ता: सिनेमॅक्स, अंधेरी - कुर्ला रोड, गुरुनानक पेट्रोल पंपाच्या मागे, गुंदवली, अंधेरी ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र 400059
3.पीव्हीआर आयकॉन सिनेमा, वर्सोवा (PVR Icon Cinemas, Versova)-
पत्ता: 3, इन्फिनिटी मॉल, अंधेरी, न्यू लिंक आरडी, फेज डी, शास्त्री नगर, वर्सोवा, मुंबई, महाराष्ट्र 40036
फोन: 088009 00009
हेही वाचा- EPFO: जुन्या कंपनीचा PF कसा करायचा विलीन? फक्त 5 मिनिटांचं आहे काम, नंतर मिळेल मोठं व्याज
4. पीव्हीआर सिटी मॉल अंधेरी (प.) मुंबई 9 PVR Citi Mall Andheri (W) Mumbai)-
पत्ता: पीव्हीआर सिटी मॉल सर्वे नं.41 ओशिवरा, अंधेरी वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र 40053
फोन: 088009 00009
5. सिनेपोलिस (Cinépolis)-
पत्ता: फन रिपब्लिक मॉल, यशराज फिल्म्स प्रा. लि., औद्योगिक क्षेत्र, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400053
6. संगम सिनेमा (Sangam cinema)-
पत्ता: 4V77+F6W, अंधेरी - कुर्ला रोड, डॉ. चरतसिंग कॉलनी, हनुमान नगर, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400053
7. मॅक्सस सिनेमा (Maxus Cinema)-
पत्ता: 3VVM+9F8, अंधेरी - कुर्ला रोड, जरीमरी, साकी नाका, मुंबई, महाराष्ट्र 400072
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andheri, Marathi cinema