• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • सतत तोंड येतंय? ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

सतत तोंड येतंय? ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

तोंड येत कशाने हे समजून घेण गरजेचं आहे. विशेषत: गर्मीच्या दिवसांत ही समस्या प्रामुख्याने जाणवते. पचनक्रियेत बिघाड होणे (weak digestive system) , याशिवाय जास्त मसालेदार , तळलेले पदार्थ खाणे यामुळे देखिल तोंड येण्याची समस्या उद्भवते.

 • Share this:
  मुंबई, 19 एप्रिल : तोंड येणे (mouth ulcer) ही खूपच सामान्य समस्या असली तरीही त्याने भयंकर असा त्रास होतो. व जेवणच काय तर साधं पाणी पिणंही कठीण होऊन बसतं. बोलतानाही भयंकर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तोंडातील हे फोड काढून टाकणे फार गरजेचे असते. पण नेमकं  तोंड येतं कशाने हे समजून घेण गरजेचं आहे. विशेषत: गरमीच्या दिवसांत ही समस्या प्रामुख्याने जाणवते. पचनक्रियेत बिघाड होणे (weak digestive system) , याशिवाय जास्त मसालेदार , तळलेले पदार्थ खाणे यामुळे देखिल तोंड येण्याची समस्या उद्भवते. कोरफड (aloe vera) लावावी कोरफड ही जवळपास सगळ्या जखमांवर काम करते. त्याचप्रमाणे तोंड आल्यावरही तिचा पुरेपूर उपयोग होतो. कोरफडीचा गर काढून तो तोंडातील फोडावर लावल्याने आराम मिळतो. बर्फ ही देईल आराम (ice) तोंड आल्यानंतर त्या फोडावर बर्फाचा खडा फिरवल्याने आराम मिळू शकतो. तोंड येण्याचं मुख्य कारण हे शरीरातील उष्णता असते. त्यामुळे बर्फ शरीरात थंडावा निर्माण करून आराम पोहोचवतो.

  तुम्ही कधी 2 लाख रुपयांचा पिझ्झा खाल्लाय? हे आहेत जगभरातील सर्वात महागडे पदार्थ

  हिरवी इलायची (cardamom) इलायची देखिल या समस्येसाठी फारच उपयुक्त आहे. इलायचीच्या दाण्याची बारीक पूड करुन त्यात मध मिसळावं व ती पेस्ट जीभेवरील फोडांवर लावावी. त्याने तोंड येण्यापासून बचाव होतो. हळद (turmeric) तोंड आल्यावर हळद फारच उपयुक्त ठरते. हळद पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो.

  PHOTOS: जगभरातील विविध देशांत निरनिराळ्या आहेत विवाह चालीरिती, जाणून घ्या यामागची खास कारणं

  नारळ पाणी (coconut water) नारळ पाणी हे शरीरात थंडावा निर्माण करण्याचा उत्तम स्त्रोत आहे. त्याचबरोबर तोंड येणंही कमी करते. तोंडातील फोडांवर या पाण्याचा मारा केल्यास जळण कमी होते. तर फोड नाहीसे होण्यास मदत करते. हिरवी कोथिंबीर (green coriander) हिरवी कोथिंबीर पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यानंतर त्याने गुळण्या कराव्यात त्याने तोंडातील फोड कमी होतात व लवकर आराम मिळतो.
  Published by:News Digital
  First published: