वॉशिंग्टन, 10 मे : आई (Pregnancy) होणं हा जगातील सर्वात सुंदर असा क्षण असतो. बाळाला नऊ महिने पोटात वाढवणं तो अनुभव काही निराळाच असतो. जो शब्दातही मांडता येत नाही. पण प्रेग्नन्सीच्या काळात तितक्या समस्या आणि प्रसूतीवेळी प्रचंड वेदनाही होतात. पण आपल्या बाळाला पाहताच तिच्या या सर्व वेदना शमतात. पण एखाद्या महिलेला फार फार किती मुलांची आई व्हायला आवडेल किंवा ती किती वेळा अशा प्रसूती वेदना सहन करेल. तुम्हाला आश्चर्य वाटले पण एका महिलेला जणू बाळ जन्माला घालण्याचं व्यसनच लागलं आहे असं म्हणण्यास हरकत नाही. तिला आधीच नुकतंच आपल्या 16 व्या मुलाला जन्म दिला आहे आणि आता सतराव्या बाळाची तयारी करत आहेत (Mother of 16 babies planning for next baby). अमेरिकेतील 39 वर्षांची पेटी. नुकतंच तिने आपल्या सोळाव्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाने जगात नुकतंच पाऊल ठेवलं आणि पेटीने आता पुढच्या बाळासाठी तयारी सुरू केली आहे. 38 वर्षांचा पती कार्लोससोबत ती आता बेबी प्लॅनिंग करते आहे. हे वाचा - ‘उमलत्या वयातले आघात आयुष्य बदलतात’; अभिनेत्रीने व्यक्त केले धक्कादायक अनुभव डॉक्टरांनी सांगितलं, सोळाव्या बाळाला जन्म देताना पेटीची हालत खूप गंभीर झाली होती. तिचा जीव वाचवणंही अशक्य झालं होतं. अनेक प्रयत्न करून तिचा जीव कसाबसा वाचवला आहे. तरीसुद्धा पेटीने आता पुढच्या बाळाची तयारी सुरू केली आहे. या कपलच्या मते, मोठं कुटुंब हा देवाचा आशीर्वाद असतो. पेटी म्हणते, मला मूलं जन्माला घालणं म्हणजे मजा वाटते. देवाला वाटलं तर तो आणखी एक बाळ आमच्या पदरात देईल. कार्लोसकडून आपल्याला मिळालेलं हे गिफ्ट आहे, असं ती मानते. हे वाचा - अजब प्रेम की गजब कहाणी! बॉयफ्रेंडला पाहताच Doggy होते ही तरुणी पेटीच्या मुलांनाही आपल्या सर्वात लहान भावाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत, असं पेटीने सांगितलं. आणखी एक खास म्हणजे पेटी आणि कार्लोसच्या प्रत्येक मुलाचं नाव C पासून सुरू होतं. त्यांच्या पंधरा मुलांची नावं सी या अक्षरावरून ठेवली आहेत. पेटीच्या सर्वात मोठा मुलगा 13 वर्षांचा आहे. त्याचं नाव ख्रिस्तोफर (Christopher) आहे. त्यानंतर ख्रिस्तन (Cristian- 9), सेलेस्टे (Celeste-8), ख्रिस्तिना (Cristina- 7), कॅरोल (Carol-4), कॅमिला (Camilla-2), कॅरलोट (Charlotte-1) आणि क्रिस्ट (Crystal ) अशी तिच्या काही मुलांची नावं आहेत. तर नुकतंच जन्माला आलेल्या सोळाव्या बाळाचं नाव क्लेटॉन (Clayton) असं ठेवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.