CoronaVirus च्या उद्रेकात नवं संकट, 11.7 कोटी मुलांना गोवरचा धोका

CoronaVirus च्या उद्रेकात नवं संकट, 11.7 कोटी मुलांना गोवरचा धोका

Coronavirus मुळे 37 देशांतील लहान मुलं गोवर-रुबेला (measles-rubella) लसीपासून वंचित राहतील, अशी चिंता UNICEF ने व्यक्त केली आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 15 एप्रिल : एकिकडे कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) लाखो रुग्णांना वाचवण्याची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे कोट्यवधी लहान मुलांचा जीव धोक्यात आहे. कारण कोरोनाव्हायरसमुळे ते गोवर-रुबेलाच्या (Measles-Rubella) लसीपासून वंचित राहतील.

कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीत गोवर-रुबेला लस न मिळाल्यास 37 देशांतील 117 दशलक्ष म्हणजे 11.7 कोटींपेक्षा अधिक मुलांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता युनिसेफने (UNICEF) व्यक्त केली आहे.

यापैकी बहुतेक मुलं गोवरचं प्रमाण जास्त असलेल्या देशातील आहेत. 24 देशांत गोवर-रुबेला लसीकरण अभियान आधीच उशिरा होतं आहे. तर आता कोरोनाव्हायरसमुळे हे अभियान स्थगित केले जातील.

लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; 'या' सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार

गोवरमुळे जगभरात दरवर्षी लाखो मुलांचा बळी जातो. व्हायरसमुळे होणारा हा संसर्गजन्य आजार आहे. 1963 साली त्यावर लस आली मात्र त्याआधी तर 2-3 वर्षांनी हा आजार पसरायचा. आता प्रभावी लस असूनही 2018 साली या आजाराने 1.40 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला होता. यात सर्वात जास्त बालकं आणि लहान मुलांचा समावेश आहे.

त्यामुळे Covid-19 मुळे गोवरप्रभावित देशांमध्ये लसीकरण कसं सुरू राहिल याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या गाइडलाइन्सनुसार काम करावं असं आवाहन युनिसेफने केलं आहे.

मिझल्स अँड रूबेला इनिशिएटिव्हने (M&R) सांगितलं, "ज्या देशांमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रभाव जास्त आहे, तिथं त्याच्याशी लढा द्यायलाच हवा मात्र त्यात मुलांच्या या लसीकरणाला विसरू नये, त्यांना ही लस मिळायलाच हवी."

Corona शांत झोपूही देईना, स्वप्नातही येऊ लागला, स्वप्नांपासून अशी मिळवा मुक्ती

"आम्ही देशांना आवाहन करतो की कोविड-19 मुळे उद्भवलेल्या अशा परिस्थितीत समाज आणि आरोग्य कर्मचा-यांची सुरक्षा लक्षात घेत, लसीकरण कार्यक्रम सुरू ठेवावेत आणि जर कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे ते शक्य नसेल, लसीकरण पुढे ढकलावं लागलं तर लस न मिळालेल्या मुलांना शोधून शक्य तितक्या लवकर त्यांना लस द्यावी."

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 15, 2020, 5:35 PM IST

ताज्या बातम्या