मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /या 5 कारणांसाठी मुलं पसंत करतात Job करणारी मुलगी

या 5 कारणांसाठी मुलं पसंत करतात Job करणारी मुलगी

Working Wife: आपला जोडीदार कसा असावा याबाबत प्रत्येकाच्या काही कल्पना असतात. मात्र पत्नी कमावती असली पाहिजे असं आजकालच्या मुलांना वाटतं आहे.

Working Wife: आपला जोडीदार कसा असावा याबाबत प्रत्येकाच्या काही कल्पना असतात. मात्र पत्नी कमावती असली पाहिजे असं आजकालच्या मुलांना वाटतं आहे.

Working Wife: आपला जोडीदार कसा असावा याबाबत प्रत्येकाच्या काही कल्पना असतात. मात्र पत्नी कमावती असली पाहिजे असं आजकालच्या मुलांना वाटतं आहे.

मुंबई, 25 फेब्रुवारी : पूर्वीच्या काळात मुलांना लग्नासाठी अशा मुली आवडायच्या ज्या घरी राहून त्यांच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतील. आता मात्र काळ बदलला आहे. (modern boys marriage preference)

आजकाल सगळ्याच मुलांना गुणी आणि सोबतच नोकरी करणाऱ्या मुलींचा शोध असतो. (modern boys want to marry working girls) मुलांना वाटतं, की त्यांच्या जोडीदारानं सर्वप्रकारे त्यांना समजून घ्यावं आणि त्यांची सोबत करावी. (modern times marriage) जणू घ्या आजकाल लग्नासाठी मुलांना वर्किंग मुलीच का पाहिजेत. (reasons why modern boys want working girls)

घरखर्चाचा वाटा उचलला जाईल

शहर मोठं असो की लहान, वाढती महागाई आणि गरजांमुळं लोकांचे खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत. चांगली जीवनशैली आणि मुलांना चांगलं शिक्षण देता यावं यासाठी दोन्ही पार्टनर्सनी कमवावं हे गरजेचं आहे. आजच्या काळात सगळ्या कुटुंबाची गरज पूर्ण करू शकणं एका व्यक्तीसाठी अवघड होऊन बसतं. यासाठी मुलांना वाटतं, की त्यांची लाईफ पार्टनर नोकरी करणारी असेल तर ती घरखर्चाला हातभार लावू शकेल.

पतीला समजणं सोपं असेल

तुमची लाईफ पार्टनर काम करणारी असेल तर कामासोबतच तुम्हालाही सहज समजू शकेल. तुम्ही कामामुळं थकून किंवा कामामुळं झालेल्या तणावानं वैतागून घरी याल तेव्हा ती त्या परिस्थितीला अधिक चांगलं समजू शकेल. अशा परिस्थितीत ती उशिरा आल्यानं तुमच्याशी भांडण किंवा वादविवाद करण्याऐवजी प्रेमानं बोलेल.

हेही वाचा तुम्ही सिंगल आहात? वाईट कशाला वाटून घेता, एकटं असण्याचे हे आहेत अनोखे फायदे

पैशांची बचत होईल

दोघेही पार्टनर्स काम करत असतील तर घरखर्च चालवण्यासह येणाऱ्या काळासाठी चांगली बचत करणंही शक्य होईल. दोघांच्या विचारानं चांगली बचत होईल. ही बचत वाईट काळात कुटुंबासाठी कामाला येईल. तुम्हाला कुणाची मदत घेण्याची अजिबातच गरज पडणार नाही. पैशांची बचत हे एक मोठं कारण आहे, की ज्यामुळं मुलं कमावत्या मुलींशी लग्न करू इच्छितात.

स्वतःचा खर्च उचलणं होईल सोपं

मुलगी नोकरी करणारी असेल तर दोन्ही पार्टनर्ससाठी हे खूप चांगलं असतं. यात मुलीला आपल्या पतीवर अवलंबून राहावं लागत नाही आणि पतीलालाही पत्नीच्या खर्चांचा ताण येत नाही. पत्नी घर संभाळण्यासह आपले खर्चही मॅनेज करू शकते. पत्नीला तिला हवं ते करण्यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

हेही वाचा प्रेरक कथा! चार महिला, ज्यांनी घराचा उंबरठा ओलांडत उजळलं स्वत:सह इतरांचं आयुष्य

ओपन आणि पॉझिटिव्ह असेल मानसिकता

नोकरी करणाऱ्या मुली बऱ्याच ओपन माईंडेड आणि सकारात्मक मानसिकता बाळगणाऱ्या असतात. त्यांना दुनियादारी चांगली समजते. एखाद्या पुरुषाला ज्या अडचणींमधून जावं लागतं त्या त्यांनाही अनुभवून माहीत असतात. त्यामुळं त्या खंबीर, सकारात्मक आणि खुल्या विचारांच्या असतात. कुठल्याही गोष्टीतून त्या सहज मार्ग काढू शकतात.

First published:
top videos

    Tags: Marriage, Personal life