Home /News /lifestyle /

संशोधकांची दमदार कामगिरी! मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने होणार कॅन्सरसह त्वचारोगांचं वेळेत निदान

संशोधकांची दमदार कामगिरी! मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने होणार कॅन्सरसह त्वचारोगांचं वेळेत निदान

कॅन्सरचं वेळेवर निदान होणं आवश्यक आहे. देशात आता एका अ‍ॅपच्या मदतीनं कॅन्सरसह 50 प्रकारच्या त्वचारोगांचं (Skin Disease) निदान अगदी काही सेकंदांत करता येणार आहे.

मुंबई, 30 मे : कॅन्सर अर्थात कर्करोग (Cancer) हा जीवघेणा आजार आहे. वेळेवर निदान, उपचार, योग्य जीवनशैली आणि आहाराच्या माध्यमातून कॅन्सर नियंत्रणात ठेवता येतो. अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा (Technology) वापर लक्षणीय वाढला आहे. अत्याधुनिक तंत्र आणि यंत्रणांमुळे आजाराचं अचूक निदान करून रुग्णांवर परिणामकारक उपचार करणं शक्य झालं आहे. काही स्मार्टफोन अ‍ॅप्सच्या (Apps) मदतीनं विशिष्ट आजारांचं प्राथमिक अंदाजवजा निदान करता येऊ लागलं आहे. याच अनुषंगानं एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कॅन्सरसह विविध त्वचारोगांचं निदान आता केवळ 15 ते 30 सेकंदांत एका अ‍ॅपच्या मदतीनं करता येणार आहे. देशभरात ही सुविधा सुरू झाली आहे. `आज तक`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कॅन्सरवर कायमस्वरूपी इलाज नाही. या आजारात शरीरातल्या पेशी नष्ट होऊन अवयव निकामी होतात. यामुळे रूग्ण दगावू शकतो. अशा परिस्थितीत कॅन्सरचं वेळेवर निदान होणं आवश्यक आहे. देशात आता एका अ‍ॅपच्या मदतीनं कॅन्सरसह 50 प्रकारच्या त्वचारोगांचं (Skin Disease) निदान अगदी काही सेकंदांत करता येणार आहे. दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात 'एम्स'ने (AIIMS) न्यूरिथम लॅब स्टार्ट-अपच्या संयुक्त विद्यमाने डर्मा-एड (DermaAID) हे स्मार्टफोन अ‍ॅप लॉंच केलं आहे. त्वचा, तोंडाच्या कॅन्सरसह त्वचाविकारांचं निदान या अ‍ॅपच्या मदतीनं 15 ते 30 सेकंदांत करणं शक्य होणार आहे. Explainer : भारतात कोरोनानंतर आता West Nile Fever चा बळी; कसा होतो हा आजार, लक्षणं काय? `एम्स`चे गुप्तरोग आणि त्वचारोग विभागाचे प्राध्यापक डॉ. सोमेश गुप्ता यांनी सांगितलं, `केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार भारतात केवळ 12.5 लाख अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर (Allopathic doctor) आहेत. त्यापैकी केवळ 3.71 लाख डॉक्टर हे स्पेशालिस्ट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. देशात त्वचाविकार तज्ज्ञांची संख्या खूपच कमी आहे. ग्रामीण भागात तर असे डॉक्टर उपलब्ध होणं अशक्य आहे. त्यामुळे त्वचाविकारांचं निदान करणारं हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.` `त्वचारोग डायग्नोस्टिक सोल्युशन मोबाइल अ‍ॅप्लिकेशन - डर्माएड हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence) अल्गोरिदमचा वापर करणार आहे. यामुळे अगदी मूलभूत स्मार्टफोन हा शक्तिशाली स्किनकेअर टूल म्हणून कार्य करू शकणार आहे. या अ‍ॅपमुळे 50 पेक्षा अधिक त्वचारोगांचं निदान शक्य होईल. या वर्षाअखेरीस त्वचारोगांची संख्या आणखी अपडेट केली जाईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून पुरळ, सोरायसिस, व्हिटिलिगो, टिनिया, एक्झिमा, अ‍ॅलोपेसिया अरेटासह, बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि मेलेनोमा या कॅन्सरच्या प्रकारांबाबत 80 टक्के अचूक माहिती मिळू शकेल,` असं डॉ. गुप्ता म्हणाले. पावसाळ्यात व्हायरल, सर्दी, फ्लू सारखे आजार होतात? आहारात या गोष्टींचा समावेश करा अन् बिनधास्त व्हा डॉ. गुप्ता म्हणाले, `डॉक्टर्ससाठी हे मोबाइल अ‍ॅप त्वचेची स्थिती समजून घेण्यासाठी एक उत्तम साधन ठरेल. सर्वसाधारण डॉक्टर्सची अचूकता त्वचारोगतज्ज्ञांच्या तुलनेत 40 ते 50 टक्के असते, असं संशोधनातून दिसून आलं आहे. या अ‍ॅपद्वारे डॉक्टर्स रुग्णाच्या शरीरावरच्या जखमेचा फोटो काढून क्लाउड सर्व्हरवर अपलोड करतात. 15 ते 30 सेकंदांत मोबाइल अ‍ॅप फोटोचं विश्लेषण करून माहिती देतं. या अ‍ॅपचं खरं काम बॅकएंडला असतं. कारण सुरक्षित सर्व्हरवर होस्ट केलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम त्वचेचा आजार आणि त्याच्या उपचारांबाबत माहिती देतात.` `त्वचारोग हे जगातले चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक होणारे आजार आहेत. भारतात अनेकांना बुरशीजन्य संसर्ग (Fungal infections) होत आहेत. यात एक्झिमा, सूज आदी समस्यांचा समावेश आहे. डर्मा-एडचा आरोग्यसेवा डाटा हा भारतातली वाढती गरज आणि स्मार्ट अ‍ॅनालिटिक्सच्या जलद विकासासह आपली आरोग्य यंत्रणा अधिक चांगली बनवू शकतो. तसंच हे अ‍ॅप स्टिरॉइड्सशिवाय बुरशीजन्य संसर्गाचा सामना करण्यासदेखील मदत करील,` असा विश्वास डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केला.
First published:

Tags: Cancer, Health, Medical

पुढील बातम्या