मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : भारतात कोरोनानंतर आता West Nile Fever चा बळी; कसा होतो हा आजार, लक्षणं काय?

Explainer : भारतात कोरोनानंतर आता West Nile Fever चा बळी; कसा होतो हा आजार, लक्षणं काय?

कोरोनानंतर एका छोट्याशा कीटकामुळे पसरणाऱ्या वेस्ट नाइल फिव्हरची दहशत आता भारतात निर्माण झाली आहे. या आजारामुळे केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनानंतर एका छोट्याशा कीटकामुळे पसरणाऱ्या वेस्ट नाइल फिव्हरची दहशत आता भारतात निर्माण झाली आहे. या आजारामुळे केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनानंतर एका छोट्याशा कीटकामुळे पसरणाऱ्या वेस्ट नाइल फिव्हरची दहशत आता भारतात निर्माण झाली आहे. या आजारामुळे केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

तिरुवनंतपुरम, 30 मे : गेल्या दोन वर्षांपासून सारं जग कोरोनाचा (Corona) सामना करत आहे. यादरम्यान कोरोनाव्यतिरिक्त अन्य काही विषाणूजन्य आजारांचे रुग्णही काही देशांमध्ये आढळून आले आहेत. सध्या काही देशांमध्ये मंकी पॉक्सचा (Monkeypox) प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) अनेक देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशात आता भारतात केरळमध्ये टोमॅटो फ्लूनंतर आता वेस्ट नाइल व्हायरसचा (West Nile Virus) संसर्ग दिसून येत आहेत. केरळमधल्या 47 वर्षांच्या एका व्यक्तीचा या फीव्हरमुळे मृत्यू झाला आहे (West Nile Fever). केरळमध्ये पुन्हा एकदा वेस्ट नाइल फीव्हरने डोकं वर काढलं आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे नुकताच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे, की या विषाणूमुळे (Virus) मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये 17 मे रोजी ताप आणि अन्य लक्षणं दिसून आली होती. लक्षणं दिसून येताच अनेक रुग्णालयांमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला त्रिसूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं; मात्र अखेर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वेस्ट नाइल फीव्हरमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ही व्यक्ती जिथं राहत होती, त्या ठिकाणी वैद्यकीय पथक तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून, नमुने गोळा केले जात आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये 6 वर्षांच्या एका मुलाचा या फीव्हरमुळे मृत्यू झाला होता. हे वाचा - पावसाळ्यात व्हायरल, सर्दी, फ्लू सारखे आजार होतात? आहारात या गोष्टींचा समावेश करा अन् बिनधास्त व्हा `डब्ल्यूएचओ`नं दिलेल्या माहितीनुसार, वेस्ट नाइल फीव्हरचा पहिला रुग्ण 1937 मध्ये सर्वप्रथम आढळून आला होता. युगांडातल्या एका महिलेला या विषाणूचा संसर्ग झाला होता. 1953 मध्ये उत्तर इजिप्तच्या नाइल डेल्टा प्रदेशात कबुतर आणि कावळ्यांमध्ये हा विषाणू आढळला होता. 1997 पूर्वी हा विषाणू पक्ष्यांसाठी जास्त धोकादायक मानला जात नव्हता, परंतु, इस्रायलमध्ये या विषाणूचा धोकादायक स्ट्रेन आढळून आला. या स्ट्रेनमुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या 50 वर्षांत अनेक देशांमध्ये या विषाणूची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत, असं `डब्ल्यूएचओ`ने सांगितलं. वेस्ट नाइल फिव्हरची लक्षणे जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनं (WHO) दिलेल्या माहितीनुसार, वेस्ट नाइल फीव्हरमध्ये ताप, डोकेदुखी, थकवा, उलट्या, तसंच कधीकधी त्वचेवर लाल चट्टे येतात. हा आजार गंभीर झाल्यास तीव्र ताप, डोकेदुखी, मान आखडणं, थरथरणं, स्नायू कमकुवत होणं अशी लक्षणं दिसतात. 150 संसर्गग्रस्त व्यक्तींपैकी केवळ एकाच रुग्णात अशी गंभीर लक्षणं दिसतात. रुग्णाला पॅरालिसिसही होऊ शकतो. या विषाणूची लागण झालेल्यांपैकी 80 टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणं (Symptoms) दिसून येत नाहीत. कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तींना या विषाणूची लागण झाल्यानंतर गंभीर आजार होऊ शकतो. तथापि, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या, तसंच अवयव प्रत्यारोपण (Transplant) झालेल्या व्यक्तींना या आजाराचा धोका जास्त असतो. वेस्ट नाइल फिव्हर कसा पसरतो? वेस्ट नाइल फीव्हरचा विषाणू सर्वसामान्यपणे डासांमुळे फैलावतो. हा विषाणू पक्ष्यांमध्ये (Birds) आढळतो. वेस्ट नाइल पक्ष्यांमधून डासांमध्ये आणि डासांच्या माध्यमातून माणसांपर्यंत पोहोचतो. संसर्ग झालेल्या पक्ष्याला डास चावल्यास, हा विषाणू डासांमध्ये येतो. असा डास माणसाला चावल्यास विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. तथापि, अन्य जनावरांच्या माध्यमातूनदेखील या विषाणूचा माणसाला संसर्ग होऊ शकतो. अवयव प्रत्यारोपण, ब्लड ट्रान्सफ्युजन, स्तनपानातूनही हा विषाणू फैलावू शकतो. आईपासून बाळाला या विषाणूचा संसर्ग झाल्याची एक केस आतापर्यंत समोर आलेली आहे. वेस्ट नाइल फिव्हरपासून बचाव कसा करावा? वेस्ट नाइल फीव्हरपासून बचाव व्हावा, यासाठी अद्याप एकही लस (Vaccine) उपलब्ध नाही. ताप येत असेल आणि विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं, तर त्यानंतर उपचार केले जातात. हा विषाणू फैलावत असल्याचं दिसून आलं तर त्या भागातल्या नागरिकांनी अवयव प्रत्यारोपण करायचं असल्यास त्याआधी लॅबमध्ये तपासणी करून घेणं गरजेचं आहे. घराचा परिसर स्वच्छ ठेवणं आणि डासांची उत्पत्ती रोखणं हा या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. जनावरांपासून माणसांना संसर्ग होऊ नये, यासाठी आजारी जनावरांवर उपचार करताना हातमोजे, तसंच प्रोटेक्टिव्ह कपडे परिधान करावेत, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. हे वाचा - Diabetes And Watermelon - डायबेटीजच्या रुग्णांनी कलिंगड खावं का, काय असावं प्रमाण? हा विषाणू डासांच्या माध्यमातून फैलावत असल्यानं डासांची केरळमध्ये आता उत्पत्ती होणारी ठिकाणं स्वच्छ केली जात आहेत.`डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रत्येकानं जबाबदारी घेतली पाहिजे. तसंच घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. ड्रेनेजसह अन्य ठिकाणी साचलेलं सांडपाणी स्वच्छ करावं लागेल,` असं केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (Health Minister Veena George) यांनी सांगितलं.
First published:

Tags: Disease symptoms, Health, Lifestyle, Rare disease

पुढील बातम्या