मुंबई, 26 ऑगस्ट : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या (Problems) असतात. काहींच्या आयुष्यात समस्या मोठ्या असतात, तर काहींच्या समस्या छोट्या असतात; पण त्या समस्यांमुळे व्यक्ती तणावात राहते. शिवाय त्यातून कुरबुरी वाढू लागतात. त्यातूनच घरातलं वातावरण नकारात्मक (Negative) होत जातं आणि अडचणी कमी न होता, त्या वाढत जातात. घरात वातावरण फक्त आपल्या अडचणींमुळे बिघडत नाही, तर त्यामागे वास्तुदोषही (Vastu Dosh) असू शकतो. घर बांधताना वास्तुशास्त्राच्या नियमांची (Vastu Shastra Rules) काळजी घेतली नाही, तर त्या घरात वास्तुदोष राहू शकतो. वास्तुदोषामुळे कुटुंबात भांडणं होतात, सुख-शांती नांदत नाही, कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ होतो. त्याचा आपलं काम, उत्पन्न, संपत्ती या गोष्टींवरही वाईट परिणाम होऊ शकतो. आपण घरातल्या वस्तू नीट, सजवून ठेवतो; पण त्या वस्तूंची दिशा चुकल्यासही अनेक अडचणी येतात. घरातल्या आरशाचा संबंध सुख-शांतीशी आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार कोणत्या प्रकारचा आरसा (Mirror) घरात असावा आणि त्याची दिशा कोणती असावी, याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आरसा कोणत्या दिशेला लावावा? वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आरसा योग्य दिशेला लावणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर आरसा लावणं उत्तम मानलं जातं. आरसा योग्य दिशेने लावल्यास आर्थिक स्थिती सुधारते. याशिवाय समाजात मान-सन्मानही वाढतो, असं मानलं जातं.
कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं
आरशाचा आकार कसा असावा? वास्तुशास्त्रानुसार, घरात लावण्यात येणाऱ्या आरशाचा आकार चौकोनी असावा, असं सांगितलं गेलंय. याशिवाय, तुमच्या घरात लावलेल्या आरशात तुमचा चेहरा स्पष्टपणे दिसला पाहिजे. आरशावर घाण असू नये आणि त्यात चेहरा अस्पष्ट दिसू नये, याची विशेष काळजी घ्यायला हवी. तुटलेला आरसा कधीही घरात ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये तुटलेला आरसा ठेवणं अशुभ मानलं जातं. घरात तुटलेला आरसा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे कधीही घरात तुटलेला आरसा ठेवू नये. आरशाला तडा गेला असेल, तर तो ताबडतोब बदलावा. अशा रीतीने वास्तुशास्त्रातले काही उपाय वापरून तुम्ही घरातली नकारात्मकता दूर करू शकता. घरातल्या आरशाची दिशा नेहमी तपासून घ्या. तसेच आरसा चौकोनी असेल याची काळजी घ्या. आरसा लावताना त्याची दिशा चुकू नये, याची विशेष खबरदारी घ्या. घरातल्या वस्तू कोणत्या दिशेला कशा ठेवल्या आहेत, याचा घरातल्या वातावरणावर फरक पडतो. त्यामुळे वास्तू टिप्सच्या मदतीने प्रत्येक वस्तू योग्य जागी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.