ब्रातिस्लावा, 09 फेब्रुवारी : जीवनमृत्यू कुणाच्या हातात नसतं, असं म्हणतात. एखादा आजार झाला की डॉक्टरही संबंधित रुग्णाच्या मृत्यूची भविष्यवाणी करतात. म्हणजे एकदा रुग्ण फार फार तर किती काळ जगू शकतो, त्याचा आजार पाहता त्याच्या हातात जगण्याचा किती वेळ शिल्लक राहिला आहे हे सांगतात. एखाद्या रुग्णाला पाहून त्याची जगण्याची तेसुद्धा आशा सोडतात. पण काही मोजते रुग्ण असे आहेत ज्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर डॉक्टरांचीही मृत्यूची भविष्यवाणी खोटी ठरवली आहे. अशाच लोकांपैकी एक आहे ती एक छोटीशी चिमुकली
(Baby with rare skin condition).
स्लोव्हाकियामध्ये
(Slovakia) जन्माला आलेली एलिझाबेथ कडलेसिक
(Elizabeth Kadlecik) एका दुर्मिळ समस्येसह तिचा जन्म झाला. तिची त्वचा खूप जाड होती. अगदी कासवासारखी तिची त्वचा होती. ज्याला टर्टल स्किन असंच म्हटलं जातं
(Girl With Turtle Skin). डॉक्टरांच्या मते, या समस्येसह जन्माला आलेल्या मुलांची त्वचा खूप टणक असते. शरीरावर चकत्या पडतात. यामध्ये क्रॅक्स पडतात. अशा त्वचेसह जगणंच अशक्य. त्यामुळे ती फार काळ जिवंत राहणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
सर्व डॉक्टरांनी एलिझाबेथच्या जगण्याची आशा सोडली होती. पण आता या वर्षात जूनमध्ये हीच चिमुकली दोन वर्षांची होणार आहे.
हे वाचा - बापरे! आईच्या एका केसामुळे लेकाचे झाले हाल; 5 महिन्यांच्या बाळाची भयंकर अवस्था
एलिझाबेथच्या आईने सांगितलं, एलिझाबेथचा जन्म प्रसूतीच्या कालावधीच्या 6 आठवडे आधीच झाला. जन्मानंतर पाच आठवडे ती आयसीयूमध्ये होती. जन्मानंतर तिने आपल्या हाताची दोन आणि पायाची चार बोटं गमावली. माझी मुलगी जिवंत राहणं हा चमत्कार आहे.
एलिझाबेथची विशेष काळजी घ्यावी लागते. या समस्येमुळे ती आपले डोळे बंद करू शकत नाही. प्रत्येक तासाला तिच्या डोळ्यांमध्ये जेल आणि आयड्रॉप टाकावे लागतात. तिच्या संपूर्ण शरीरावर बँडेज लावावं लागतं. दिवसभरात दोनवेळा लाँग बाथ घ्यावी लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.