मुंबई, 29 एप्रिल: जग हे अनेक प्रकारच्या आश्चर्यांनी भरलेलं आहे, असं म्हटलं जातं. त्याचा अनुभव आपण अनेकदा घेत असतो. सात जागतिक आश्चर्य हा एक वेगळा भाग आहेच. पण ऑनलाइन विश्व (Online World) हे त्याहूनही अधिक आश्चर्यांनी भरलेलं आहे. तिथं रोज काही ना काही तरी अजब-गजब, विचित्र पाहायला मिळतं. सध्या अशाच एका विचित्र अशा बॅगेची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. खुर्चीसारखी दिसणारी ही छोटीशी बॅग (Mini chair bag). तिच्या आकाराप्रमाणेच तिच्या किंमतीमुळेही चर्चेत आहे.
नॉर्डस्ट्रॉम या ऑनलाइन स्टोअरवर ही बॅग विकायला ठेवण्यात आली आहे. या बॅगेचा आकार खुर्चीसारखा आहे. जणू एखादी छोटीशी खुर्ची एका चैनीला बांधली आहे आणि ती खांद्यावर लटकवली आहे, अशीच ही बॅग.
A hobby of mine is finding ridiculous items for sale at Nordstrom’s. This might be my best find yet. pic.twitter.com/racNtYs0jB
— Lexi Brown, PhD (@lexilafleur) April 21, 2021
लेक्सी ब्राउन (Lexi Brown) या ट्विटर युझरने नॉर्डस्ट्रॉम या ऑनलाइन स्टोअरवरून (E-Commerce Website) ही बॅग शोधून काढली आणि त्याबद्दलचं ट्विट केलं. त्यासोबत त्या बॅगेचा फोटोही पोस्ट केला. crystal-embellished Pave Chair Bag असं त्या बॅगेचं नाव त्या साइटवर देण्यात आलं आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'नॉर्डस्ट्रॉमवरून अत्यंत फालतू वस्तू शोधणं हा माझा छंद आहे. ही बॅग हा माझा आतापर्यंतचा सर्वांत उत्तम शोध असेल.'
हे वाचा - अबब! ही आहे भारतातली सगळ्यात उंच सायकल, 'लिम्का बुक'मध्येही नोंद
आता बॅग म्हटलं की त्यात काहीतरी आपण ठेवतो. पण या एवढ्याशा खुर्चीच्या बॅगेत तुम्ही काहीच ठेवू शकत नाही. या बॅगेचा उपयोग काहीच नाही. खरं तर तिला बॅग म्हणण्यासारखं काहीही तिच्यात नाही. पण ती पर्स किंवा बॅगेसारखी हाताला लटकवता येते म्हणून तिला बॅग म्हणायचं. तरी ही बॅग ऑनलाइन विक्रीला ठेवण्यात आली आहे.
नॉर्डस्ट्रॉम (Nordstrom) या ई-कॉमर्स वेबसाइटवर त्या बॅगची जी माहिती दिली आहे, त्यात स्पष्ट लिहिलं आहे, की काही ठेवण्यासाठी या बॅगचा उपयोग होणार नाही. ही बॅग न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सादर करण्यात आली होती.
हे वाचा - याला म्हणतात LUCK! ऑनलाईन ऑर्डर केले Apple आणि डिलिव्हरीत मिळाला iPhone
आश्चर्याचा धक्का तर तुम्हाला या बॅगेची किंमत वाचून बसेल. याची किंमत आहे तब्बल 895 डॉलर्स म्हणजे जवळपास 66 हजार794 रुपये. काहीच उपयोगाची नसलेली ही बॅग इतक्या हजारो रुपयांना विकली जाते आहे. या चेअर बॅगवर क्रिस्टल्स लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे 'ही बॅग तुम्ही तुमच्यासोबत घेतली असेल, तर तुम्ही लुटले जाल,' असंही लेक्सी विनोदीपणे म्हणाली आहे.
ही बॅग पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. अनेक नेटिझन्सनी त्यांनी शोधलेल्या अशा बऱ्याच विचित्र वस्तूंचे फोटो शेअर केले आहेत आणि आपले भन्नाट किस्सेही सांगितले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Online shopping, Viral, Viral photos