नवी दिल्ली, 07 डिसेंबर : मधुमेह हा आजार फक्त देशातीलच नाही तर संपूर्ण जगाची समस्या बनलेला आहे. भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललेली आहे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेहाचा त्रास होतोय ही एक गंभीर समस्या आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढत जाते. मधुमेह हा आजार आपली जीवनशैली आणि आपल्या पचनक्रियेशी निगडित असतो. त्यासोबतच अतिताण घेण्यामुळे देखील मधुमेह होतो, असं सांगितलं जातं.
मधुमेह झाल्यानंतर तो कायमस्वरुपी बरा होत नाही. मात्र, रक्तामधील साखरेची पातळी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करता येतात. मधुमेह झाला म्हणजे शरीरामध्ये इन्शुलिनची निर्मिती कमी प्रमाणात व्हायला सुरुवात झाली असंही म्हटलं जातं. रक्तात साखरेची पातळी वाढली की सतत लघवीचा येणे, सारखी तहान लागणे, वजन वाढणे, जखम झाल्यास ती बरी होण्यास जास्त काळ लागणे असे त्रास होतात. मधुमेहामुळे काही वर्षानंतर हृदय, डोळे आणि किडनी या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. मधुमेहामध्ये शरीरात चरबी वाढणे, ऍसिड वाढणे आणि पोषक द्रव्यांचा अभाव निर्माण होणे. ही देखील लक्षणं पाहण्यात येतात.
मेथी दाणे मधुमेहावर औषध
टाईप -2 हा डायबेटीस 95 टक्के भारतीयांमध्ये दिसून येतो. मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रणात राहणं अत्यंत आवश्यक असतं. मेथीदाणे खाण्याने रक्तामधील साखर नियंत्रणात येते. मेथी मध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम,प्रोटीन आणि आयर्न यासारखे पोषक घटक असतात. मेथीमध्ये सोल्युबल नावाचा फायबर असतो, ज्यामुळे शरारीत कार्बोहायड्रेट्स शोषण क्रिया मंद होते. म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांना चपाती,भात वर्ज करावा लागत नाही. काही प्रमाणात खाता येतो.
मेथीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. म्हणून आयुर्वेदामध्ये डायबिटीस रुग्णांसाठी मेथी अमृतासमान मानली गेली आहे. मेथीमध्ये सोडियम, झिंक, फॉस्फरस, फॉलिक ऍसिड, आयर्न,कॅल्शिअम,पोटॅशियम याबरोबर व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी आणि व्हिटॅमीन सी आणि के यासोबत फायबर आणि प्रोटीन स्टार्च,फॉस्फरिक ऍसिड,न्यूट्रॉन्स असतात. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येते. जाणून घेऊयात मेथी जाण्याचा उपयोग कसा करायचा.
हे वाचा - Heart Attack: तारुण्यात हार्ट अटॅक टाळायचा असेल तर काही गोष्टींना पर्याय नाही
वापर करण्याची पद्धत
मेथी दाण्यांचा उपयोग सुंदर केसांसाठी आणि निरोगी त्वचेसाठी करता येतो. तसाच तो हाय ब्लड शुगरच्या रुग्णांसाठी देखील करता येतो. यामुळे कोलेस्ट्रॉल देखील कमी होतो. हाय ब्लडप्रेशर आणि वजन कमी करण्यासाठी देखील मेथी खाण्याने फायदा होतो. डायबेटीस पेशंटसाठी मेथी वापराचे अनेक फायदे आहेत. रात्री मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत घालून ते पाणी पिण्याने फायदा होतो. रात्री झोपण्याआधी मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालावेत.
हे वाचा - किडनी ट्रान्सप्लांट कसं होतं? एका Kidney वर सामान्य आयुष्य जगता येतं?
दुसऱ्या दिवशी हे पाणी रिकाम्या पोटाने प्यावं. याशिवाय मोड आलेली मेथीही खाता येते. मेथी तशी चवीने कडू असते. त्यामुळे मेथीचे सेवन खाण्यास टाळाटाळ केली जाते. पण, मेथीला मोड आणून खाल्ल्यास तिचा कडूपणा कमी होतो. यासाठी मेथी रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी एका कापडामध्ये बांधून ठेवावी. दोन-तीन दिवसात मेथीला चांगले मोड येतात अशी मेथी दररोज रिकाम्या पोटाने खाल्ल्यास फायदा मिळतो. हे उपाय केल्यानंतर अर्ध्या तासानं तरच इतर आहार घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diabetes, Health Tips, Sugar, Tips for diabetes