मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा

Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा

Easy tips to get rid of Negative thoughts: सततच्या नकारात्मक विचारांमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थकवा, निद्रानाश आदी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळंच मनात नकारात्मक विचार वाढू न देणं महत्त्वाचं आहे. नकारात्मकता येणार नाही म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

Easy tips to get rid of Negative thoughts: सततच्या नकारात्मक विचारांमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थकवा, निद्रानाश आदी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळंच मनात नकारात्मक विचार वाढू न देणं महत्त्वाचं आहे. नकारात्मकता येणार नाही म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

Easy tips to get rid of Negative thoughts: सततच्या नकारात्मक विचारांमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थकवा, निद्रानाश आदी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळंच मनात नकारात्मक विचार वाढू न देणं महत्त्वाचं आहे. नकारात्मकता येणार नाही म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : काळाच्या ओघात लोकांवर कामाचा ताण वाढत जातो. यासोबतच चिडचिड, चिंता, त्रास, नात्यातील कटुता इत्यादीही मनात वाढतात. ज्यांना हे दु:ख नीट हाताळता येतं, ते पुढे जातात. पण काही लोकांना या बाबी नीट हाताळता येत नाहीत. अशा वेळी त्यांच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. मनातील सतत नकारात्मक विचार अनेक प्रकारच्या समस्यांना एकत्र घेऊन येतात. यामुळं मानसिक समस्या तर वाढतातच; पण अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे (Easy tips to get rid of Negative thoughts) लागते.

सततच्या नकारात्मक विचारांमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थकवा, निद्रानाश आदी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळंच मनात नकारात्मक विचार वाढू न देणं महत्त्वाचं आहे. नकारात्मकता येणार नाही म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. हे सोपं नसलं तरी येथे आम्ही काही टिप्स सांगत आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मनातील नकारात्मकतेपासून दूर राहू शकता. जाणून घेऊया या टिप्स.

नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्यासाठी टिप्स

सकारात्मक लोकांसोबत रहा

TOI च्या बातमीनुसार, नकारात्मक विचार दूर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नकारात्मक लोकांसोबत न राहणे. नेहमी सकारात्मक लोकांसोबत रहा. त्यांची सोबत असू द्या. नेहमी आनंदी राहण्याचा आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

सकारात्मक रहा

नकारात्मक गोष्टींचा विचारही करू नका. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात, तेव्हा थोडेसे चालत जा किंवा शारीरिक हालचालींमध्ये स्वतःला व्यग्र ठेवा. तुमचं लक्ष नेहमी सकारात्मक गोष्टींवर केंद्रित करा आणि सकारात्मक गोष्टींचा विचार करा. तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. तुमच्या छंदानुसार काम करा.

इतरांकडून अपेक्षा करणं सोडून द्या

इतरांकडून वेगवेगळ्या अपेक्षा ठेवण्याची आपल्याला सवय असते. यामध्ये आपल्याशी संबंधित काही लोकांनी आपल्या म्हणण्यानुसार वागावं, ही आपली सर्वांत मोठी अपेक्षा असते आणि ही मोठी चूक ठरते. अपेक्षाभंगाचं दुःख होत राहतं. शिवाय, न राहवून आपण त्या व्यक्तीला कधी कधी निष्कारण वाईट वागणूकही देत राहतो. यामुळं नातेसंबंध बिघडू शकतात. यातून नकारात्मक परिस्थिती निर्माण होऊन मनात नकारात्मक विचार येत राहतात.

इतरांना त्यांचं स्वातंत्र्य दिल्यामुळं आपल्यालाही स्वातंत्र्य मिळतं ही बाब लक्षात घ्या

प्रत्येकाला आपापल्या विचाराप्रमाणं वागण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यास त्यातून आनंद होत असतो. ही बाब तुमच्यासह इतरांच्या बाबतीतही सत्य आहे. आपण एखाद्याला आपलं म्हणणं सांगू शकतो. मात्र, त्या व्यक्तीला पूर्णपणे बदलू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वेगळेपणासह त्याची कोणती ना कोणती खासियत असते. याचा शोध घेऊन त्यातून आनंद घेतल्यानं सकारात्मकता वाढते. शिवाय, आपण आपला अहंकार सोडून इतरांना स्वातंत्र्य दिल्यामुळं आपल्यालाही अहंकारातून आणि नकारात्मक विचारातून मुक्ती मिळत असते. म्हणजेच आपल्याही स्वातंत्र्य मिळत असतं.

हे वाचा - Healthy Life: हा टेस्टी ब्रेकफास्ट आहे अनुष्का शर्माच्या सडपातळ आरोग्याचे गुपित

क्षमाशील व्हा

दैनंदिन जीवनात अनेक लोक तुम्हाला त्रास देऊ शकतात. काही लोक तुम्हाला खूप त्रास देऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांना माफ करायला शिका. माफीपेक्षा मोठा परोपकार नाही. कोणाचा सूड घेण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

मदत

जेव्हा जेव्हा तुमच्या मनात जास्त नकारात्मकता येते तेव्हा इतरांना मदत करा. तुमच्या आजूबाजूला कोणतीही व्यक्ती असेल आणि तो काही अडचणीत असेल तर त्याला मदत करा. यामुळं तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमचा मूडही चांगला होईल.

हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक

व्यायामावर लक्ष केंद्रित करा

जेव्हा जेव्हा मनात नकारात्मकता असते तेव्हा शारीरिक हालचाली वाढवा. वर्कआउटमुळं तुमचं आरोग्य तर चांगलं राहतंच. शिवाय, तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी राहता.

First published:

Tags: Health Tips, Mental health