मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Mental health: डिप्रेशनमध्ये जाण्याची ही असतात लक्षणं; त्यातून बाहेर काढण्यासाठी मित्र, नातेवाईकांना अशी करा मदत

Mental health: डिप्रेशनमध्ये जाण्याची ही असतात लक्षणं; त्यातून बाहेर काढण्यासाठी मित्र, नातेवाईकांना अशी करा मदत

Tips to identify depressed people: WHO च्या म्हणण्यानुसार, जगातील सुमारे 28 कोटी लोक सक्रियपणे नैराश्यग्रस्त आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना नैराश्याचा धोका जास्त असतो. यासोबतच, प्रौढांपेक्षा वृद्धांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : नैराश्य येणं हा एक सामान्य मानसिक आजार आहे, ज्याचा बहुतेक लोकांना कधी ना कधी सामना करावा लागतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरातील प्रौढ लोकसंख्येपैकी सुमारे 5 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या स्वरुपात नैराश्यात आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली असते तेव्हा त्याला नैराश्य येऊ लागते. यामध्ये व्यक्ती खूप चिंताग्रस्त राहते. ही एक कठीण मानसिक समस्या आहे. यामध्ये व्यक्तीची सकारात्मकता संपुष्टात येऊ लागते आणि त्याला कोणतेही काम करावेसे वाटत नाही. WHO च्या म्हणण्यानुसार, जगातील सुमारे 28 कोटी लोक सक्रियपणे नैराश्यग्रस्त आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना नैराश्याचा धोका जास्त असतो. यासोबतच, प्रौढांपेक्षा वृद्धांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असते. तसेच द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन 2021 ऑन माय माइंडच्या अहवालात असेही म्हटले आहे की, भारतातील 15 ते 24 वयोगटातील 41 टक्के मुले आणि किशोरवयीन मुलांनी मानसिक आजारासाठी उपचार घेतल्याचे मान्य केलं आहे. म्हणजेच लहान मुले देखील नैराश्यापासून (Tips to identify depressed people) दूर नाहीत.

तीव्र नैराश्यात, एखादी व्यक्ती आत्महत्या देखील करू शकते. त्यामुळे वेळोवेळी सतर्क राहण्याची गरज आहे. जर तुमचे कोणी मित्र, नातेवाईक या समस्येने त्रस्त असतील, तर त्यांना मदत करणं गरजेचं आहे. हेल्थलाइनच्या बातमीत याबाबत काही टिप्स सांगण्यात आल्या आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही नैराश्यग्रस्त लोकांना ओळखू शकता आणि त्यांना वेळीच मदत करू शकता.

नैराश्याची लक्षणे अशी ओळखा

असा व्यक्ती नेहमी काळजीत असतो, दुःखी असतो आणि छोट्या-छोट्या गोष्टी बोलताना त्याला अश्रू येऊ शकतात.

निराशावादी अधिक बोलतो, भविष्याबद्दल हताश होतो.

नेहमी शून्यता आणि अपराधीपणाने ग्रस्त.

एकत्र वेळ घालवण्यात स्वारस्य दाखवत नाही आणि बोलणंही टाळण्याचा प्रयत्न करतो.

हे वाचा - तुम्हालाही नीट दिसत नाही का? डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी या घरगुती उपायांचा करा अवलंब

खूप सहज अस्वस्थता आणि चिडचिड होते.

उत्साहाचा अभाव, खूप हळू-हळू चालणं आणि निराशेत राहणं.

कशाचीही काळजी घेत नाही. त्याचं सर्व सामान, साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं असतं.

कशातही रस दाखवत नाही.

झोपेच्या प्रक्रियेत गडबड असणे. म्हणजे एकतर खूप जास्त झोपणे किंवा अजिबात न झोपणे.

कशावरही त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही.

एकतर खूप खाणे किंवा खूप कमी खाणे.

अनेकदा मृत्यू आणि आत्महत्येबद्दल बोलतात.

हे वाचा - Winter Skin Care: हिवाळ्यातही तुमची त्वचा राहील कोमल, मुलायम; फक्त या गोष्टींची काळजी घ्या

त्यांना अशी मदत करा

अशा मित्रांशी, नातेवाईकांशी बोला. त्यांचे सांत्वन करा. त्यांच्यासमोर सकारात्मक गोष्टी बोला.

त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांचे काम सोपे होईल.

त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा आणि थेरपीसाठी मदत करा.

त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवून त्यांना भावनिक मदत करा.

तुम्ही त्यांना त्यांच्या कामात मदत करून करू शकता. यामुळे त्यांचे नैराश्य कमी होऊ शकते.

डिप्रेशनमध्ये राहणाऱ्या लोकांना तुमच्याकडे येण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी आग्रह करा.

त्यांच्याशी नेहमी संपर्कात राहा.

First published:

Tags: Depression, Mental health