मुंबई, 3 जानेवारी : पैठणी ही महाष्ट्राच्या परंपरेची वेगळी ओळख आहे. पैठणी हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लग्न समारंभात पैठणी साडीला सगळ्यात जास्त मागणी असते. त्यामुळे महिलांकडून पैठणी साडीची खरेदी केली जाते. मात्र, आता पुरुषांसाठी देखील पैठणी पासून बनवलेले लग्नासाठी कपडे मुंबई च्या मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत. पुरुषांसाठी या कपड्यामध्ये काय काय आहे जाणून घेऊया. कोणत्या प्रकारचे आहेत कपडे? पैठणी साडी म्हटलं की स्त्रियांची मक्तेदारी पाहायला मिळते. मात्र, स्त्रियांच्या मक्तेदारीला छेद देत मुंबईतील दादरमधील नाविन्य हॅण्डलूम स्टुडिओ या दुकानात पैठणी कपड्यापासून बनवलेले पुरुषांसाठीचे कपडे उपलब्ध आहेत. यामध्ये फेटा, टोपी, पेशवेकालीन पगडी, सदरा, जॅकेट, कोट, धोतर, मोजडी, असे विविध प्रकार मिळतात. तर महिलांसाठी काठापदराची पैठणी साडी, नऊवारी सहावारी, बनारसी पैठणी, पैठणी फ्रॉक, पैठणी महिलांचे सदरे, पैठणीचा वन पीस असे अनेक प्रकार येथे उपलब्ध आहेत. 1 हजारपासून ते 5 हजारापर्यंत यांची किंमत आहे. तसेच या दुकानात लहान मुलांसाठी कुटुंबांसाठी विशेष कपडे तयार करून दिले जातात.
कपडे आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला मी गेल्या 20 वर्षापासून दिव्यांग मुलांच्या शाळेत शिक्षिका आहे. त्यासोबतच गेल्या तीन वर्षांपासून मी नावीन्यज हॅण्डलूम स्टुडिओ हे दुकान चालवत आहे. प्रत्येक ग्राहकाला काहीतरी वेगळं अपेक्षित असतं आणि तेच वेगळेपण देण्याचे काम नाविन्यज हॅण्डलूम कायम करत असतं. महिलांसाठी पैठणी साड्या मार्केटमध्ये उपलब्ध होत्या मात्र पुरुषांसाठी कपडे नव्हते हेच कपडे आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे, असं नावीन्यज हॅण्डलूम स्टुडिओ दुकानाच्या मालक सोनाली घाटे यांनी सांगितलं.
कुठं मिळतील हे कपडे? नाविन्य हॅण्डलूम स्टुडिओ, गोविंदजी केणी रोड, नायगाव, दादर, मुंबई, महाराष्ट्र संपर्क : सोनाली घाटे बाणे - 8419900429