Home /News /maharashtra /

Pune : सावधान! पैठणी खरेदीमध्ये होऊ शकते फसवणूक; अस्सल पैठणी ओळखण्यासाठी 'हा' VIDEO जरूर पहा

Pune : सावधान! पैठणी खरेदीमध्ये होऊ शकते फसवणूक; अस्सल पैठणी ओळखण्यासाठी 'हा' VIDEO जरूर पहा

पैठणी

पैठणी साडी

महिलांमध्ये पैठणीची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा ग्राहक वर्गही मोठा आहे. पण, बऱ्याचदा बाजारात येवला पैठणी सांगून सरळ सरळ ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अस्सल पैठणी ओळखण्यासाठी ही VIDEO फारच महत्त्वाचा आहे.

    पुणे, 29 जून : पैठणी ही महाष्ट्राच्या परंपरेची वेगळी ओळख आहे. जगभरात प्रसिद्ध अशी ही पैठणी स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येत महिलेला असं वाटतं की, एक तरी पैठणी आपल्याकडे असावी. जिच्याकडे पैठणी असते, ती अतिशय आवडीने पैठणी साडी नेसून मिसरवतदेखील असते. पैठणीच्या नावाखाली अनेक बोगस पैठणी साड्या विकल्या जातात. मूळ आणि अस्सल पैठणी कशी ओळखायची, हे आज आपण जाणून घेऊया... ...कशी ओळखाल अस्सल पैठणी? 1) पैठणी साडीच्या पदर आणि काठावरती पुढील बाजूस जी नक्षी असते, त्याच नक्षीचं प्रतिबिंब साडीच्या मागेदेखील असते. 2) अस्सल पैठणीच्या मागील नक्षीला अगदी छोट्या गाठी असतात. प्रत्येक विणकर एक एक धागा जोडून पैठणी बनवतो. त्यामुळे पैठणीचा धागा हा बांगडी किंवा अंगठीमध्ये अडकत नाही. यामुळे पैठणला जाळी लावण्याची गरज लागत नाही.  यामुळेच सहा-सहा पिढ्यांपर्यंत पैठणी टिकून राहते. 3) अस्सल पैठणीला सिल्क मार्क असतो. सिल्क मार्क ऑफ इंडियाकडून हा मार्क सिल्कच्या विणकर आणि विक्रेत्यांना उपलब्ध करून दिला जातो. हा मार्क असेल तर साडीमधील सूत हे प्युअर असते. 4) शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैठणीचा काठ आणि पदर हे हातमागावरती बनवलेले असतात. त्यामुळे ते अखंड असतात. काठ आणि पदर मुख्य साडीपासून वेगळे अजिबात असत नाही. 5) 'आसावली' ही पैठणीची अस्सल आणि मुख्य डिझाइन आहे. मोर आणि पोपटाची डिझाईन ही पैठणीमध्ये नंतरच्या काळात आली आहे. वाचा : ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता पैठणीचं वैशिष्ट्य आणि इतिहास काय आहे? अस्सल पैठणीची किंमत ही 15 हजारांपासून सुरू होते. सर्वात महाग पैठणीची किंमत ही 8 लाखांपर्यंत असते. सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांच्या कालखंडात गोदावरी तीरावरील पैठण या ठिकाणी पैठणी साडीचा उद्योग नावारूपास आला. पैठण येथील वस्त्र म्हणून तिचे नाव पैठणी पडले आहे. पैठणी ही अस्सल सुती रेशीम धाग्यांनी विणलेले असते. वाचा : अरे बापरे! चुकून दीड कोटी पगार पोहोचला खात्यात, मालामाल झालेल्या गड्यानं नोकरी सोडली अन्.. पैठणी खरेदीमध्ये कशी फसवणूक होऊ शकते? पैठणी घेताना अनेकदा आपली फसवणूक होत असते. त्यामध्ये अस्सल पैठणी कशी असते, याची कल्पनाही ग्राहकांना नसते. आंध्र प्रदेश आणि इतर ठिकाणावरून अनेकदा पैठणीच्या नावाखाली दुसऱ्या साड्यांची विक्री होते. या अस्सल पैठणी नसतात. या साड्यांच्या मागील नक्षीही बेढब असते. तसेच त्यांचे धागे बांगडी आणि अंगठीमध्ये अडकून खराब होतात, अशा साड्या आपल्याकडे येवला पैठणी म्हणूनदेखील विकल्या जातात. या पैठणीचे काठ आणि पदर हे मुख्य साडीला नंतर जोडलेले असतात.
    First published:

    Tags: Maharashtra News, Pune

    पुढील बातम्या