
संपूर्ण हात भरून किंवा खूपच कमी डिझाईन असलेली मेहंदी लावायची नसेल तर, अशा प्रकारे हातावर पूर्ण बोट डिझाइन आणि वेल बनवता येईल. या नक्षीदार मेहंदीने हातांच्या सौंदर्यात भर पडेल. (Image- Instagram/mehndibykashe)

ही भरगच्च मेहंदी लग्नानंतर पहिल्यांदाच येणाऱ्या सणांना किंवा पहिल्या वर्षातील सणांना काढता येईल. यामुळे तुमचे हात सुंदर दिसतील. अशाच प्रकारे पायांवरही डिझाइन तयार करता येईल. (Image- Instagram/mehandibytanzeela)

बर्याच महिलांच्या दोन्ही हातांवर मेहंदीचे वेगवेगळी डिझाईन्स बनवतात. पण जर तुम्हाला दोन्ही हातांना सारखंच डिझाइन करायचं असेल, तर तुम्ही या चित्रात दाखवलेल्या मेहंदीसारखी रचना करू शकता. (इमेज- Instagram/shabnam_mehendi_kochi)

या प्रकारची मेहंदी डिझाइन तुमच्या हातांना नक्कीच मोहक बनवेल. हातांची मेहंदी रंगण्यासाठी मेहंदी लावून ती सुकू लागल्यावर साखरपाणी लावलं जातं. तसंच, मेहंदी पूर्ण सुकल्यानंतर त्याला खोबरेल तेल लावावं. त्यानंतर काही वेळाने मेंदी खरडून काढावी. त्यानंतर हात केवळ पाण्याने धुवावे. हात फार चोळून धुवू नयेत. (Image- Instagram/henna_by_abayahgirl)

जर तुम्हाला फुले आणि पानं असलेली मेहंदीची रचना आवडत असेल तर, तुम्ही अशी रचना करू शकता. (Image- Instagram/mehndiholic._)




