आता घरातही MASK वापरा; कोरोनापासून बचावासाठी मोदी सरकारची नवी सूचना

आतापर्यंत घराबाहेर तुम्हाला मास्क (Mask) वापरण्याचा सल्ला दिला जात होता.

आतापर्यंत घराबाहेर तुम्हाला मास्क (Mask) वापरण्याचा सल्ला दिला जात होता.

  • Share this:
    मुंबई, 26 एप्रिल : मास्क (Mask) हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरा, अशा सूचना सरकार वारंवार देत होतं. डॉक्टरही असाच सल्ला देत होते. आपणही घराबाहेर जाताना न विसरता मास्क लावून जातो. पण आता फक्त घराबाहेरच मास्क पुरेसं नाही तर घरातही मास्क लावायला हवं (use mask at home), अशा सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. घरातही मास्क वापरा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. केंद्र सरकारने देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी नीती आयोगाचे डॉ. व्ही. के. पॉल यांनी मास्क वापरण्यावर भर दिला. डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, "आता घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे. घरात असतानाही मास्क वापरा. विशेषतः तुमच्या घरात कोरोना रुग्ण असेल तर त्या रुग्णासह घरातील इतर सदस्यांनीही मास्क घालायचा हवा" हे वाचा - ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला कोरोनाव्हायरस हा हवेतूनही पसरतो, असं नुकतंच लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात सांगण्यात आलं आहे. शिवाय दिल्लीतील एम्सचे संचालक यांनीसुद्धा घराबाहेर न पडतानाही कोरोनाचा धोका कसा आहे, हे न्यूज 18 शी बोलताना सांगितलं होतं. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं, "कोरोनाचा संसर्ग हवेतूनही होतो. एअरोसोल्स (Aerosols) अर्थात पाच मायक्रॉनपेक्षा लहान आकाराच्या कणांद्वारेही तो पसरू शकतो. हे कण हवेत जास्त काळ राहू शकतात. एखादी खोकणारी-शिंकणारी व्यक्ती खोलीत तुमच्यापासून दोन मीटर अंतरावर असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळून गेलात, तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. म्हाताऱ्या व्यक्ती घराबाहेर पडत नसतील. पण बाहेरून येणाऱ्या व्यक्ती उदा. घरकाम करणारी स्त्री, काही तरी दुरुस्तीसाठी येणारा मेकॅनिक आदी व्यक्तींमध्ये लक्षणं दिसत नसली, तरी ते कोरोनाचे वाहक असू शकतात. ते घरात येऊन संसर्ग पसरवू शकतात" हे वाचा - तुम्हाला हवी ती Corona vaccine घेता येईल का? सरकारने काय सांगितलं पाहा "त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही येणार असाल, तर त्या सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटिव्हच आहेत, असं समजूनच वागायला हवं. शारीरिक अंतर, मास्क घालणं, हातांची स्वच्छता या उपायांचा कायम अवलंब करायला हवा. घरातली हवा खेळती राहणंही गरजेचं आहे. त्यासाठी खिडक्या उघड्या ठेवायला हव्यात. कारण त्यामुळे घरातल्या हवेत चुकून संसर्ग पसरला असेलच, तर तो बाहेर जाऊ शकतो", असा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published: