आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत कित्येक लोकांना उन्हात बसण्यासाठी वेळ मिळणं कठीण झालं आहे. परंतु, व्यग्र जीवनशैली असली तरी सूर्यप्रकाश आपल्या हाडांसाठी आवश्यक आहे, कारण यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी वाढते.
स्लीप एपनियामुळेही हाडांच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आपण नेहमी पुरेशी झोप मिळावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. झोप आणि आपलं आरोग्य याचा खूप संबंध आहे. नीट झोप लागणं आरोग्यासाठी फायदेशीर असते.
दारू पिण्याची सवय अनेकदृष्ट्या आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे हाडेही कमकुवत होतात. असं सांगितलं जातं की जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानंही, हाडांसाठी आवश्यक हार्मोन्सच्या निर्मितीवर परिणाम होतो. कार्बोनेटेड पेये प्यायल्यानंही हाडांची घनताही कमी होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिगारेट ओढल्याने हाडे कमजोर होतात. तुम्हीही सिगारेट ओढत असाल तर तुम्हाला ही सवय सोडावी लागेल.
हाडं कमकुवत होण्यापाठीमागे आपला आळसही खूप कारणीभूत ठरतो. धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही किंवा त्याचे नियोजन होत नाही. अनेकांची शारीरिक हालचाल फारच कमी असते, त्यामुळे हाडे नाजूक होतात.