ब्रिटन, 12 मार्च : तुम्हाला एखादा पदार्थ आवडत असेल आणि तो खायची इच्छा झाली तर तुम्ही फार फार तर काय कराल? एकतर तो पदार्थ स्वतः बनवून खाल, जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन खाल, एखाद्या दुकानात मिळत असेल तर तिथे जाऊन आणून खाल किंवा ऑनलाइन ऑर्डर कराल. तरी तो पदार्थ तुम्हाला मिळत नसेल तर मग तुम्ही नंतर कधीतरी खाऊ अशी स्वतःची समजूत काढून तो दिवस कसातरी पुढे ढकलाल. पण एका व्यक्तीनं आपलं आवडतं सँडविच (sandwich) खाण्यासाठी आपलं मन असं मारलं नाही तर ती व्यक्ती चक्क हेलिकॉप्टरनं (helicopter) गेली आणि तिनं आपली सँडविच खाण्याची इच्छा पूर्ण केली. सँडविचसाठी हेलिकॉप्टरने एका व्यक्तीने तब्बल 130 किमी दूर प्रवास केला आहे. लॉकडाऊनमध्ये (lockdown) या व्यक्तीला सँडविच खाण्याची इच्छा झाली. ही इच्छा त्याने अशा पद्धतीने पूर्ण केली आहे. chippingfarmshop या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत पाहू शकता, हेलिकॉप्टरमधून आलेल्या एका व्यक्तीला डिलिव्हरी बॉय सँडविच देतो आणि त्यानंतर तो कॅमेऱ्यात पाहून थम्सअपही करतो. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडीओ पाहून कित्येक प्रतिक्रिया येत आहेत. हे वाचा - OMG! चक्क हवेत उडू लागली कासवं; दुर्मिळ VIDEO पाहण्याची संधी बिलकुल सोडू नका दरम्यान ही पहिली घटना नाही. याआधी रशियातील एका व्यक्तीने फक्त बर्गर खाण्यासाठी लाखो रुपये खर्चून हेलिकॉप्टर बुक केलं होतं. दोन तासांसाठी जवळपास 2 लाख रुपये त्याने हेलिकॉप्टर राईडवर खर्च केले. आपल्या आवडीचा बर्गर खाण्यासाठी हेलिकॉप्टरनं तब्बल 362 किलोमीटरचा प्रवास त्याने केला होता.