Home /News /lifestyle /

झोपेच्या औषधाची कमाल! 8 वर्षे हलू-बोलू न शकणारी व्यक्ती 20 मिनिटांतच बरी झाली

झोपेच्या औषधाची कमाल! 8 वर्षे हलू-बोलू न शकणारी व्यक्ती 20 मिनिटांतच बरी झाली

फोटो सौजन्य - कोर्टेक्स जर्नल

फोटो सौजन्य - कोर्टेक्स जर्नल

एरवी झोपेचं औषध (sleeping medicine) झोप येण्यासाठी घेतलं जातं मात्र या व्यक्तीला झोपेचं औषध दिल्यानंतर खऱ्या अर्थाने 8 वर्षांनी ती व्यक्ती जागी झाली असंच म्हणवं लागेल.

    अॅमस्टरडॅम, 21 ऑक्टोबर : एखादी व्यक्ती कित्येक वर्ष अंथरूणावर आहे. ती बोलू शकत नाही, चालू शकत नाही, काही खाऊही शकत नाही. त्या व्यक्तीवर कोणतेच उपचार परिणामकारक ठरत नाही. मात्र एका औषधाने अवघ्या काही मिनिटांतच ती व्यक्ती अगदी ठणठणीत बरी झाल्यासारखी उठून बसते, असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही आणि बसला तरी हा चमत्कारच वाटेल. त्यातही विशेष म्हणजे फक्त झोपेची गोळी (sleepingh pill) घेतल्यानंतर हलू-बोलू न शकणारा माणूस अगदी पटकन जागा होऊन बसतो. हे तर त्याहूनही आश्चर्यकारक आहे. अशीच आश्चर्यकारक बाब घडली आहे ती नेदरलँडमध्ये. जिथं गेल्या 8 वर्षांपासून अंथरूणाला खिळलेली व्यक्ती फक्त एक झोपेची गोळी घेताच काही मिनिटांतच बरी झाली. कोर्टेक्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. रिचर्ड गेल्या 8 वर्षांपासून अंथरूणाला खिळलेला. ना तो बोलू शकत होत, ना चालू शकत होता, ना खाऊ शकत होता. मात्र फक्त झोपेची एक गोळी दिली आणि काही मिनिटांतच तो उठून बसला. इतकंच नव्हे तर आपल्या वडिलांशी तो फोनवर बोलला आणि त्याने स्वत:हून फूड ऑर्डर दिली. हे वाचा - ...तर पालकच घेणार पोटच्या गोळ्याला संपवण्याचा निर्णय; डॉक्टर देणार मृत्यू 8 वर्षांपूर्वी 29 वर्षांचा रिचर्ड मांस खात असताना मांसाचा तुकडा त्याच्या घशात अडकला. ज्यामुळे त्याचा श्वास कोंडला आणि परिणामी त्याच्या मेंदूला हानी पोहोचली. त्याला  akinetic mutism ही मेंदूची दुर्मिळ समस्या उद्भवली. यामध्ये ती व्यक्ती बोलू शकत नाही, हलू शकत नाही. काही खाऊ शकत नाही. मात्र ती डोळ्याने सर्व पाहू शकते आणि आपण काय बोलत आहोत हे ऐकू शकते. रिचर्डवर बरेच उपचार झाले, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. शेवटी Zolpidem या झोपेच्या औषधाचा मेंदूच्या काही समस्यांवर चांगला परिणाम होऊ शकतो, याबाबत डॉक्टरांना माहिती झाली. त्यांनी रिचर्डवर या औषधाचा प्रयोग करायचं ठरवलं. रिचर्डच्या कुटुंबाची यासाठी परवानगी घेतली. दुसरा कोणताच मार्ग दिसत नसल्याने रिचर्डचं कुटुंबदेखील तयार झालं. हे वाचा - कसं काय शक्य आहे? डोक्याला एकही जखम नाही आणि तिच्या मेंदूत दिसल्या टोकदार वस्तू रिचर्डला Zolpidem या झोपेच्या औषधाचा एक डोस देण्यात आला आणि औषध घेतल्यानंतर फक्त 20 मिनिटांतच त्याचा परिणाम दिसून आला. मात्र या औषधाचा परिणाम तात्पुरत्या स्वरूपात होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे आता कायमस्वरूपी उपचारासाठीही डॉक्टर प्रयत्न करत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या