कसं काय शक्य आहे? डोक्याला एकही जखम नाही आणि तिच्या मेंदूत दिसल्या टोकदार वस्तू

कसं काय शक्य आहे? डोक्याला एकही जखम नाही आणि तिच्या मेंदूत दिसल्या टोकदार वस्तू

ज्या महिलेच्या डोक्यात टोकदार वस्तू होत्या तिलादेखील याची माहिती नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनाही धक्काच बसला.

  • Share this:

बीजिंग, 17 ऑक्टोबर : एखादा अपघात किंवा दुर्घटना झाल्यानंतर शरीरात एखादी धारदार वस्तू घुसण्याच्या घटना आजवर बऱ्याच घडल्यात. मात्र आता एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये किरकोळ अपघात झाला, डोक्याला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्या व्यक्तीच्या मेंदूत टोकदार वस्तू घुसलेल्या दिसल्या. हे पाहून डॉक्टरही हैराण झाले.

ही घटना आहे चीनमधील (china). जेंगझाऊनमधील 29 वर्षीय महिलेचा (Chinese Woman)  छोटासा कार अपघात (Car Accident) झाला. तिला फारशी दुखापत झाली नव्हती डोक्याला आतून मार लागला नाही ना हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी तिला डोक्याचा सीटी स्कॅन(CT Scan)  करायला सांगितलं. तिच्या सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये अपघातामुळे तिला कोणतीही दुखापत झाली नाही हे स्पष्ट झालं. मात्र तिच्या मेंदूत काहीतरी विचित्र वस्तू असल्याचं दिसलं. ही वस्तू म्हणजे टोकदार सुई (Needles) होती.

झू नावाच्या या महिलेच्या मेंदूत अशी एक नाही तर दोन सुया होत्या. या सुयांची लांबी 5 सेमी आणि व्यास 4.9 मिमी होता. या दोन्ही सुया तिच्या मेंदूत खोलवर रुतल्या होत्या. विशेष म्हणजे या सुयांचा कार अपघाताशी संबंध नव्हता. म्हणजे या सुया कार अपघातामुळे महिलेच्या मेंदूत गेल्या नव्हत्या. कारण तशा काही जखमा या महिलेच्या डोक्यावर नव्हत्या. याशिवाय महिलेनं आपल्याला कधी डोक्याला गंभीर दुखापत झाली असावी याची माहितीही नव्हती.

हे वाचा - तरुणीच्या डोळ्यातून खरंच वाहू लागले 'खून के आंसू'; पाहून डॉक्टरही झाले हैराण

त्यामुळे  कदाचित या महिलेनं या सुया लहान असताना डोक्यात मुद्दामहून घुसवल्या असतील, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. कारण प्रौढ व्यक्तीच्या डोक्यात इतक्या मोठ्या सुया रुतणं शक्यच नाही, असं डॉक्टर म्हणाले.

दरम्यान चीन वेबसाईट सोहूच्या रिपोर्टनुसार, महिलेने याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. या सुया तिच्या मेंदूत कुणी दुसऱ्या व्यक्तीने रुतवल्या असाव्यात असा संशय तिला आहे. मात्र तिला लगेच कुणाचं नाव घ्यायचं नाही.

Published by: Priya Lad
First published: October 17, 2020, 9:48 PM IST

ताज्या बातम्या