जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हसता-बोलता Heart Attack ने घेतला जीव; Sidharth Shukla च्या मृत्यूनंतर हादरवणारा हा VIDEO

हसता-बोलता Heart Attack ने घेतला जीव; Sidharth Shukla च्या मृत्यूनंतर हादरवणारा हा VIDEO

हसता-बोलता Heart Attack ने घेतला जीव; Sidharth Shukla च्या मृत्यूनंतर हादरवणारा हा VIDEO

अवघ्या काही सेकंदात हार्ट अटॅकमुळे गमावला जीव.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 सप्टेंबर : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. अगदी फिट असणाऱ्या सिद्धार्थला वयाच्या चाळीशीतच हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) मृत्यू झाला. यावर खरंतर कुणाचाही विश्वास बसत नाही आहे. पण आता मृत्यू कधी, कुणाला येईल सांगू शकत नाही. विशेषतः हार्ट अटॅक (Heart Attack video) आता कमी वयातही आणि हसता-बोलता-चालताही येऊ शकतो. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर असाच एका व्यक्तीला आलेल्या हार्ट अटॅकचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. एका व्यक्तीला बोलता बोलता हार्ट अटॅक आला आणि अवघ्या पाच सेकंदाच त्याचा मृत्यूही झाला. सिद्धार्थच्या मृत्यूने जितका धक्का बसला आहे, तितकाच धक्का हा व्हिडीओ पाहूनही तुम्हाला बसेल (Shocking video).

हा व्हिडीओ एका बँकेतील आहे. व्हिडीओत पाहू शकता बँकेत काही लोक रांगेत उभे आहेत. दोन व्यक्ती एकमेकांशी बोलताना दिसत आहे. त्यानंतर एक व्यक्ती थोडा वेळ शांत उभी राहते आणि बोलता-बोलता उभ्या उभ्या ती धाडकन कोसळते. त्या व्यक्तीला असं अचानक पडताना पाहून त्याच्या आजूबाजूचे लोकही शॉक झाले. त्याला काय झालं त्यांनाही समजेना त्या व्यक्तीला लगेच पाणीही देण्यात आलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे वाचा -  सिद्धार्थसारखाच या स्टार्सनीही गमावलाय जीव; Herat Attack नंतर तातडीचे 5 उपाय यूट्युबवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. याला लाइव्ह हार्ट अटॅक असं हॅशटॅग देण्यात आलं आहे. याचा अर्थ या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे तो खाली कोसळला आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला, असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. तसा हा व्हिडीओ बराच जुना आहे. पण कुठला आहे माहिती नाही. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू हार्ट अटॅकमुळेच झाला आहे, याची पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात