जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / OMG! आगीवर नाही तर 'थप्पड़ मारकर' शिजवलं चिकन; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

OMG! आगीवर नाही तर 'थप्पड़ मारकर' शिजवलं चिकन; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

डॉक्टरांच्यामते आहारात हाय प्रोटीन डाएट घ्यायला हवा. यासाठी स्प्राऊट, सोयाबीन, पनीर, डाळ, बीन्स, अंड्याचा सफेद भाग, मासे, चिकन खायला हवं. बॅलन्स डाएट घेतल्यामुळे व्हिटॅमिन, अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट आणि मिनरल्स मिळतात.

डॉक्टरांच्यामते आहारात हाय प्रोटीन डाएट घ्यायला हवा. यासाठी स्प्राऊट, सोयाबीन, पनीर, डाळ, बीन्स, अंड्याचा सफेद भाग, मासे, चिकन खायला हवं. बॅलन्स डाएट घेतल्यामुळे व्हिटॅमिन, अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट आणि मिनरल्स मिळतात.

सटासट सटासट मारल्यानंतर शेवटी पाहू शकता चिकन चक्क शिजतं (chicken cooked by slapping) आणि ती व्यक्ती हे शिजलेलं चिकन खातेसुद्धा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च : पदार्थ (Food) कोणताही असो, तो एकतर आगीवर (Fire) शिजवतो (Cooking) किंवा फार फार तर मायक्रोव्हेवमध्ये. पण कधी फक्त ‘थप्पड’ मारून  पदार्थ शिजवल्याचं  (chicken cooked by slapping)  तुम्ही ऐकलं आहे का? नाही ना. पाहणं, ऐकणं तर दूरच साधी अशी कल्पनाही तुम्ही करू शकत नाही किंवा स्वप्नातही असं पाहू शकत नाही. पण एका व्यक्तीने ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. जगभरात वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. त्यामध्ये वैविध्यता असली तर एक गोष्ट सामान्य असते ती म्हणजे पदार्थ आगीवर शिजवले जातात. पण  एका व्यक्तीने हटके स्टाइलने चिकन शिजवलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral video) होतो आहे.

या व्यक्तीने चिकन शिजवलं आहे ते आगीवर नाही तर चक्क मारून मारून. फक्त ऐकून, सांगून किंवा वाचून तुमचा यावर विश्वास बसणार नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हा व्हिडीओच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. हे वाचा -  लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर…; हर्ष गोएंका यांचा VIDEO होतोय व्हायरल लुईस वेझ ( Louis Weisz) नावाच्या युट्युब चॅनेलवर चिकनचा का व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती चिकनला एका मशीनखाली ठेवते. त्यानंतर मशीनवरील हात चिकनवर मारायला सुरुवात करतो. एक…दोन… असे हजारो थप्पड ही मशीनचिकनवर मारते. सटासट सटासट मारल्यानंतर शेवटी पाहू शकता चिकन चक्क शिजतं आणि ती व्यक्ती हे शिजलेलं चिकन खातेसुद्धा. हाताने मारून मारून उष्णता निर्माण होते. हे तापमान चक्क 60 डिग्रीपर्यंत पोहोचतलं आणि त्यानंतर मग चिकन शिजतं. हे वाचा -  अरे हे काय? मृतावस्थेत असलेलं हरण चक्क पळू लागलं; शिकारीचा VIDEO होतोय व्हायरल हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. प्राचीन काळात लोक कच्चं मांस खात होते. वर्तमानात शिजवून खात आहेत आणि भविष्यात थप्पड मारणार, अशा बऱ्याच कमेंट हा व्हिडीओ पाहिल्यानंतर येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात