मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आईची ड्युटी निभावत मलायका अरोरा कशी ठेवते स्वतःला फीट; अभिनेत्री दिल्या खास टीप्स

आईची ड्युटी निभावत मलायका अरोरा कशी ठेवते स्वतःला फीट; अभिनेत्री दिल्या खास टीप्स

अभिनेत्री मलायका अरोराने खास महिलांसाठी काही योगासनं दाखवली आहेत.

अभिनेत्री मलायका अरोराने खास महिलांसाठी काही योगासनं दाखवली आहेत.

अभिनेत्री मलायका अरोराने खास महिलांसाठी काही योगासनं दाखवली आहेत.

मुंबई, 03 सप्टेंबर : आई होणं हा महिलांसाठी जितका आनंदाचा क्षण आहे, सर्वात अनमोल असं नातं आहे तितकाच ही जबाबदारी म्हणजे थकवणारी आहे. पण तरी एक आई असलेली अभिनेत्री मलायका अरोरा मात्र  (Actress Malaika Arora) याला अपवाद आहे असंच वाटतं. कारण तिच्याकडे  पाहिलं की तिला अठरा वर्षांचा मुलगा (Malaika Arora' son)  आहे यावर विश्वासच बसत नाही. किंबहुना जेव्हा तिचा मुलगा तिच्यासोबत असतो तेव्हा ती त्याची आई कमी बहीण किंवा मैत्रिणीच वाटतं (Malaika Arora fitness tips) . अगदी ती त्याच्याच वयाची दिसते. पंचेचाळीशी पार असलेली आणि 18 वर्षांच्या मुलाची ही आई स्वतःला इतकं कसं मेंटेन ठेवतं (Malaika Arora beauty tips), असा प्रश्न पडतोच ना.

मलायका पाहून अनेक आईंना वाटतं की आपणसुद्धा मलायकासारखे स्लीम ट्रिम, ब्युटीफूल आणि फ्रेश असतो तर (Malaika Arora yoga) . अशाच आईंसाठी मलायकाने आपला खास फिटनेस मंत्रा शेअर केला आहे. तिने खास आईंसाठी काही टीप्स दिल्या आहेत. मदर्स डेच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर तिने आपला एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिने महिलांसाठी विशेषत: मातांसाठी उपयुक्त अशी तीन योगासनं सांगितली आहेत.

मलायकाने सांगितलेल्या योगासनात उत्कटासन, त्रिकोणासन आणि वृक्षासनाचा समावेश आहे. ही योगासनं नियमित केल्यास महिलांमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात, असं मलायका अरोराने सांगितलं.

नियमितपणे उत्कटासन करून महिला संपूर्ण शरीराची, विशेषतः कमरेची ताकद वाढवू शकतात. जखडलेले खांदे मोकळे होण्यास या आसनामुळे मदत होते. उत्कटासन करण्यासाठी पाय थोडेसे बाजूला करून उभं राहावं. शरीर सरळ ठेवावं आणि दोन्ही हात समोर ठेवावेत आणि हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने ठेवावेत. त्यानंतर कंबर आणि मान सरळ ठेवून, गुडघे वाकवून नितंब गुडघ्यांच्या बरोबरीने आणावे. या अवस्थेत तुमची मुद्रा खुर्चीवर बसल्याप्रमाणे होईल. या स्थितीत थोडावेळ राहिल्यानंतर थकवा जाणवल्यास जमिनीवर झोपून विश्रांती घ्यावी, असं मलायका अरोरानं सांगितलं.

हे वाचा - चिमुकल्याच्या पांढऱ्या केसांनी वाढवलं टेन्शन! का येतंय बालवयातच म्हातारपण?

त्रिकोणासनाचा अभ्यास स्तनदा मातांसाठी फायदेशीर आहे. कारण या आसनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. हे आसन करताना आपले पाय कमरेपासून थोडे दूर करून उभं राहावं. त्यानंतर उजवा पंजा बाहेरच्या बाजूस वळवावा. यानंतर दोन्ही बाजूंनी हात पसरावेत आणि श्वास सोडत कमरेपासून उजव्या पायापर्यंत वाकवावे. उजव्या हाताला उजव्या टाचेचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा आणि डोकं डाव्या हाताला आकाशाच्या दिशेनं ठेवावं. यानंतर श्वास घेत वर यावं आणि नंतर दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे क्रिया करावी, असं मलायका अरोरानं सांगितलं.

हे वाचा - सुहाना खान ते न्यासा देवगण परदेशात शिकत आहेत हे 'Star Kids'

प्रत्येक आई वृक्षासनाचा अभ्यास करून शरीराचे पोश्चर आणि समतोल सुधारू शकते. या आसनाने शारीरिक, तसंच मानसिक आरोग्य लाभतं. हे आसन करताना, प्रथम सरळ उभं राहावं. यानंतर आपला उजवा पाय वाकवून उजवा तळवा डाव्या गुडघ्याजवळ आणावा आणि शरीर संतुलित करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा संतुलन साध्य होईल, तेव्हा एक दीर्घ श्वास घ्यावा आणि डोक्यावर हात घेऊन नमस्कार मुद्रा करावी. या स्थितीत काही काळ राहावं, असं मलायका अरोरानं सांगितलं.

First published:

Tags: FAMILY, Health, Mother, Women