जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Makar Sankrant : हलव्याच्या दागिन्यांमध्ये यंदा काय आहे ट्रेन्डिंग? पाहा Video

Makar Sankrant : हलव्याच्या दागिन्यांमध्ये यंदा काय आहे ट्रेन्डिंग? पाहा Video

Makar Sankrant : हलव्याच्या दागिन्यांमध्ये यंदा काय आहे ट्रेन्डिंग? पाहा Video

मकर संक्रातीनिमित्त हलव्याचे दागिने घालणे ही आपली परंपरा आहे. मुंबईच्या बाजारात कोणते दागिने ट्रेन्डिंग आहेत ते पाहूया

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 3 जानेवारी : नवीन वर्ष सुरू होताच आता सर्वांना मकर संक्रांतीचे वेध लागले आहेत. हा इंग्रजी वर्षातील पहिला मोठा सण असल्यानं सर्वत्र आनंद आणि उत्साह असतो. मकर संक्रातीनिमित्त हलव्याचे दागिने घालणे ही आपली परंपरा आहे. या निमित्तानं नव दाम्पत्याचे, सुनेचे, लेकीचे आणि तान्ह्या बाळापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलाचे कौतुक व्हावे हा त्यामधील हेतू असतात. मुंबईतील बाजारात संक्रातीच्या निमित्तानं हलव्याचे कोणते दागिने यावर्षी ट्रेन्डिंग आहेत ते पाहूया काय आहे नवं? ग्राहकांची आवड लक्षात घेता दागिन्यातही नवे प्रकार दिसू लागले. कुंदन, टिकल्या, वेगवेगळ्या प्रकारचे मणी, हलवा यांपासून बनवलेले मंगळसूत्र, ठुशी, हार, नथ, कानातले, वेल, बांगड्या, तोडे, कंठी, चिंचपेटी, गजरा, बाजूबंध तसेच नाजूक नक्षीकाम केलेले हलव्याचे दागिने ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतात. लग्नात दिसाल आणखी परफेक्ट! पैठणीपासून पुरुषांसाठीही आहेत अनेक पर्याय, Video महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही वेगवेगळे दागिने आहेत. पुरुषांसाठी हलव्याच्या माळांनी सजवलेला फेटा, पगडी, हार, अंगठी, बिगबाळी, पेन,पारंपरिक हलव्याच्या दाण्यांनी सजवलेले श्रीफळ बाजारात आहेत. तान्ह्या बाळाचे बोरन्हाण करण्यासाठी `वाळा सेट’ बनवला जातो, ज्यात श्रीकृष्णाच्या पेहराव्यासकट, गळ्यातला हार, गजरे, मुकुट, बासरी, मोरपीस असते. तर, छोट्या मुलींसाठी माळ, हेअरपीन, कानातले, बांगड्या ह्यांचा सेट मिळतो. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी तऱ्हेतऱ्हेचे दागिने मिळतात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    काय आहे किंमत? हलव्याचे दागिने बनवायला आम्ही 1 महिना आधीपासून सुरुवात करतो. नव नवीन गोष्टी शोधून दागिने बनवतो. या दागिन्यांच्या किंमत 500 रुपयांपासून सुरु होते. ऑर्डर असेल त्या पद्धतीनं पैसे ठरवले जातात. यंदा जावई हार चांगलाच चर्चेत आहे. आम्ही पारंपारिक पद्धतीनं दागिने करतो. या कामात माझे सहकारी मला मदत करतात. हे दागिने तयार करण्यास भरपूर मेहनत लागते. आम्ही ती मेहनत आवडीनं करतो, असं विक्रेत्या अनिता नाईक यांनी सांगितलं.

    गुगल मॅपवरून साभार

    अधिक माहितीसाठी संपर्क :  +917738760391

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात